You are currently viewing भांडुप येथील तुषार दरवेस यांचे वैभववाडी येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

भांडुप येथील तुषार दरवेस यांचे वैभववाडी येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

मुंबई प्रतिनिधी

देवगड – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कट्टा गावचे सुपुत्र भांडुप मुंबईस्थित तुषार शांताराम दरवेस यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दि. १७ मे रोजी मुंबईकडे परत असताना वैभववाडी येथे दुःखद निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते.
मुलांना सुट्टी असल्याने ते देवगड आणि कोकण परिसरात भ्रमंती करण्यात करिता आले असता , त्यांना थोडासा त्रास जाणवू लागला. औषध उपचार घेऊन पुढील उपचारासाठी त्यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु वैभववाडी येथे त्यांची प्रकृती अचानक खालावली गेली आणि त्यांना अखेर मृत्युने गाठले. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
तुषार दरवेस हे मुंबई पोर्ट ट्रस्टसचे कर्मचारी आणि हरहुन्नरी कलाकार म्हणून परिचित होते. भांडुप पश्चिमेच्या नरदास नगर विभागातील पांडव कुंड येथे ते आशा सदन येथे राहत होते.
मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे होणाऱ्या एकांकिका स्पर्धेत ते हिरीरीने सहभाग घेत असतं. तसेच त्यांनी संमोहन शास्त्राचा परिपूर्ण अभ्यास केला होता. अनेकांना त्यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी कळताच देवगड आणि भांडुप परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. लोभसवाण्या स्वभावाच्या दरवेस यांच्या पश्चात आई आशालता, बहिण उज्ज्वला, भाऊ अनिल, भावजय, पत्नी मनिषा ,दोन मुलगे, दोन पुतणे, सूनबाई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला भांडुप कांजूर मधील कला, क्रीडा, सामाजिक, व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पार्थिवावर भांडुप पश्चिम येथील हिंदू स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. तुषार दरवेश यांच्या दुःखद निधनाने अनेकांनी शोक भावना व्यक्त केल्या.
त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांना अश्रू आवरणे कठीण जातं होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा