पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थकी लावणार – निलेश राणे

पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थकी लावणार – निलेश राणे

सावंतवाडी
भाजपचे नेते तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आशीर्वादाने आपल्याला हे पद मिळाले असून पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील. पक्षाला माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. एवढेच नव्हे तर कोकणात भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष केल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा ठाम विश्वास भाजपचे नवनिर्वाचित प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी शहरातील कार्यकर्त्यांकडून झालेल्या भव्य स्वागतानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कार्यकर्त्यांप्रती ऋण व्यक्त केले. आम्ही जे काही आहोत ते या आमच्या सहकाऱ्यांमुळेच आहोत. हे त्यांचे प्रेम आणि त्यांच्या ऋणातच राहणे यातच आम्हाला समाधान आहे. पक्षाने माझ्यावर पदाची जबाबदारी दिल्यानंतर हा माझा पहिलाच दौरा आहे. या दौर्‍यात कार्यकर्त्यांनी उस्फूर्तपणे केलेलं हे जल्लोषी स्वागत व दाखविलेल प्रेम अभूतपूर्व असून मी नेहमीच त्यांच्या ऋणात राहीन, अशी भावनिक प्रतिक्रियाही दिली त्यांनी यावेळी दिली. सावंतवाडी शहरातील जल्लोषी स्वागतानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा