You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील जत्रेत जुगाराच्या मैफिली

सावंतवाडी तालुक्यातील जत्रेत जुगाराच्या मैफिली

*पोलिसांचे पेट्रोलिंग संशोधनाचा विषय….*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जत्रोत्सव सुरू झाले आणि जुगाराच्या मैफिलींना पेव चढला. सावंतवाडी तालुक्यातील जत्रेत स्थानिक यंत्रणेला हाताशी धरून जुगाराच्या बैठका बसविण्यासाठी मांडवली केली जाते. स्थानिक यंत्रणेला हाताशी धरून भागवाभागवी केल्याने रात्री पोलिसांची पेट्रोलिंग करणारी गाडी येऊन गेली की जुगाराची पालं टाकली जातात आणि खुलेआम जुगार खेळला जातो. त्यामुळे जत्रेत जुगारांमुळे पेट्रोलिंग करणारी गाडी हा संशोधनाचा विषय बनला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर अग्रवाल यांनी नियुक्ती झाल्यावर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा स्थिरस्थावर करताना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना जत्रेतील जुगारासंबंधी सक्त आदेश दिले असतानाही जत्रोत्सवात उशिरा जुगार सुरू होतात. या जत्रेतील जुगारांवर अनपेक्षित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता जुगार पाहण्यासाठी उभे असलेले बघे धावपळीत नाहक जायबंदी होतात आणि जुगारी मात्र सहीसलामत पळतात.

स्थानिक यंत्रणेला हाताशी धरून सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील जत्रेत अशाचप्रकारे जुगाराच्या बैठका बसल्या असताना सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता भीतीपोटी जुगार पाहणारे बघे पळताना जायबंदी झाले. त्यामुळे जत्रोत्सवात पेट्रोलिंग करणारे पोलीस अधिकारी मात्र संशोधनाचा विषय बनले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावर वेळीच लक्ष देऊन यंत्रणेला सतर्क करावे अशी जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा