कणकवली
साकेडी ग्रा प मध्ये नुकत्याच बिनविरोध निवडून आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या ग्रा प सदस्य समीक्षा संतोष परब यांनी ठाकरे गटाला धक्का देत आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत समीक्षा परब या बिनविरोध विजयी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचे ठाकरे गटाकडून अभिनंदन देखील करण्यात आले होते. मात्र महिनाभराच्या आतमध्येच समीक्षा परब यांनी आमदार नितेश राणेंच्या हस्ते भाजपाचा झेंडा हाती घेतला. यावेळी संतोष परब, वसीम शेख, सूरज यादव आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी सरपंच सुरेश साटम, उपसरपंच प्रज्वल वर्दम, माझी उपसरपंच जेऊर शेख, माझी सभापती संजय शिरसाट, संदीप सावंत, रमाकांत सापळे, पंढरीनाथ ढवण, रवींद्र कोरगावकर, अजित शिरसाट, प्रशांत जाधव, राजू म्हसकर आदी उपस्थित होते.