You are currently viewing पडेल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गोवा येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन…

पडेल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गोवा येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन…

पडेल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गोवा येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन…

देवगड

पडेल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी व महिलांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी गोवा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेला भेट देऊन समुद्रातील जीवसृष्टी या विषयावर माहिती घेण्यात आली. हा अभ्यास दौरा पडेल सरपंच भूषण पोकळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.

या अभ्यास दौर्‍यामध्ये १०० विदयार्थी व महिलांचा समावेश होता. महिलांसाठी गोवा येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट देवून नारळ नर्सरी व कृषी बाबतची माहिती देण्यात आली. यावेळी तेथील एन.आय.ओ. या संस्थेला भेट देवून समुद्रातील जीवसृष्टी बाबतची माहिती महिलांना व्यवसायाच्या दृष्टीकोनातून देण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख अशोक जाधव, ग्रामपंचायत सदस्य सिध्देश पाटणकर, शरयु अनभवणे, सानिका तानावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा