You are currently viewing गझल मंथन साहित्य संस्थेचे पहिले अखिल भारतीय मराठी गझल संमेलन

गझल मंथन साहित्य संस्थेचे पहिले अखिल भारतीय मराठी गझल संमेलन

*गझल मंथन साहित्य संस्थेचे पहिले अखिल भारतीय मराठी गझल संमेलन*

परभणी (गुरुदत्त वाकदेकर) :

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे गझल मंथन साहित्य संस्थेचे पहिले अखिल भारतीय मराठी गझल संमेलन शनिवार, दिनांक १३ मे २०२३ आणि रविवार, दिनांक १५ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी स्थानिक आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. निमंत्रिताच्या गझल मुशायऱ्यात सर्वश्री प्रमोद खराडे, अध्यक्ष म. भा. चव्हाण, प्रशांत वैद्य, दर्शन शहा, डॉ. ज्ञानेश पाटील, अझीझखान पठाण, मारोती मानेमोड, सिद्धार्थ भगत, नितीन देशमुख आणि सर्व श्रीमती सुनिती लिमये, प्राजक्ता पटवर्धन यांचा सहभाग होता.
दोन दिवसांत झालेल्या एकूण १३ मुशायऱ्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील १७५ नामवंत गझलकारांनी आपल्या रचना सादर केल्या.
डॉ. कैलास गायकवाड यांनी संमेलनाचे अध्यक्ष प्रमोद खराडे यांची प्रकट मुलाखत घेतली. तेव्हा गझल विधेला वश करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य द्यावे लागते असे खराडे यांनी नमूद केले.
ज्येष्ठ गझलकार श्री. म. भा. चव्हाण यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रसिद्ध गझल गायक संकेत नागपूरकर यांच्या बहारदार गझल गायनाने गझल मैफिल रंगतदार झाली.
संमेलनात सहभागी झालेल्या सर्व गझलकारांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
गझल मंथन साहित्य संस्थेचे मार्गदर्शक डॉ. स्नेहल कुलकर्णी, श्रीमती उर्मिला बांदिवडेकर, सर्वश्री निलेश कवडे, रत्नाकर जोशी, जयवंत वानखडे, देव कुमार, शाम खामकर, डॉ. राज रणधीर आणि डॉ. शिवाजी काळे यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अनिल कांबळे आणि इतर पदाधिकारी यांच्यासोबत अपार मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + seven =