You are currently viewing 33 व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेवर “सफरचंद” नाटकाचा ठसा

33 व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेवर “सफरचंद” नाटकाचा ठसा

*33 व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेवर “सफरचंद” नाटकाचा ठसा*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

33 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सरगम व अमरदीप, मुंबई या संस्थेच्या सफरचंद या नाटकासाठी रु. 7 लाख 50 हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे:- स्क्रिप्टीज क्रिएशन व रंगाई, मुंबई या संस्थेच्या “पुनश्च हनिमून” या नाटकास रु. 4 लाख 50 हजाराचे द्वितीय पारितोषिक आणि वेद प्रॉडक्शन्स हाऊस एलएलपी, मुंबई या संस्थेच्या “हीच तर फॅमिलीची गंमत आहे” या नाटकास रु. 3 लाखाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
दिग्दर्शन:- प्रथम पारितोषिक (रु.1,50,000/-) संतोष पवार (नाटक – हीच तर फॅमिलीची गंमत आहे), द्वितीय पारितोषिक (रु.1,00,000/-) राजेश जोशी (नाटक – सफरचंद), तृतीय पारितोषिक (रु.50,000/-) संदेश कुलकर्णी (नाटक – पुनश्च हनिमून)
नाट्यलेखन:- प्रथम पारितोषिक (प्रथम पारितोषिक (रु.1,00,000/-) संदेश कुलकर्णी (नाटक – पुनश्च हनिमून) संदेश कुलकर्णी (नाटक – पुनश्च हनिमून), द्वितीय पारितोषिक (रु.60,000/-) डॉ. श्वेता पेंडसे (नाटक – 38 कृष्ण व्हिला), तृतीय पारितोषिक (रु.40,000/-) आदित्य मोडक (नाटक – मी स्वरा आणि ते दोघं)
प्रकाश योजना:- प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) भौतेष व्यास (नाटक-सफरचंद), द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-), अशुतोष पराडकर (नाटक – पुनश्च हनिमून), तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) रवि-रसिक (नाटक – चारचौघी)
नेपथ्य:- प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) संदेश बेंद्रे (नाटक – सफरचंद), द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) मीरा वेळणकर (नाटक – पुनश्च हनिमुन), तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) संदेश बेंद्रे (नाटक – 38 कृष्ण व्हिला)
संगीत दिग्दर्शन:- प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) सचिन जिगर (नाटक – सफरचंद), द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) पुरुषोत्तम बेर्डे (नाटक – संज्या छाया), तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) अशोक पत्की (नाटक – हीच तर फॅमिलीची गंमत आहे)
वेशभूषा:- प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) तारा देसाई (नाटक – सफरचंद), द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव (नाटक – संज्या छाया), तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) शाल्मली टोळये (नाटक – मी स्वरा आणि ते दोघं)
रंगभूषा:- प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) राजेश परब (नाटक – सफरचंद), द्वितीय पारितोषिक (रु.30,000/-) उल्लेश खंदारे (नाटक – संज्या छाया), तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) शरद सावंत (नाटक – मी, स्वरा आणि ते दोघं)
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व रु.50,000/- पुरुष कलाकार:- आनंद इंगळे (नाटक – खरं खरं सांग), डॉ. गिरीष ओक (नाटक – 38 कृष्ण व्हिला), संदेश कुलकर्णी (नाटक – पुनश्च हनिमुन), शंतनू मोघे (नाटक – सफरचंद), पंढरीनाथ (पॅडी) कांबळे (नाटक-कुर्रर्रर्रर्र).
स्त्री कलाकार:- डॉ. श्वेता पेंडसे (नाटक – 38 कृष्ण व्हिला), मुक्ता बर्वे (नाटक – चारचौघी), अमृता सुभाष (नाटक – पुनश्च हनिमून), पूर्णिमा केंडे अहिरे (नाटक – सारखं काही तरी होतयं), निवेदिता सराफ (नाटक – मी, स्वरा आणि ते दोघं)

दि. 17 एप्रिल ते 11 मे 2023 या कालावधीत रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रेमानंद गज्वी, डॉ. अनिल बांदिवडेकर, नारायण जाधव, श्रीमती स्वरुप खोपकर व श्रीमती मीना नाईक यांनी काम पाहिले. तर समन्वयक म्हणून राकेश तळगावकर, स्वप्नजा भडभडे, अवधूत पावसकर व सहकारी यांनी काम पाहिले. तर लक्षवेधी सुंदर छायाचित्रं सिद्धेश्वर वांदरकर यांनी टिपली आहेत. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे. तसेच स्पर्धेतील कलाकार व तंत्रज्ञांनी भविष्यात रंगभूमीची अधिकाधिक सेवा करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा