You are currently viewing लगीन घाई

लगीन घाई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललित लेख*

*लगीन घाई*

आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा।
गृहतके मधुपर्क पुजन करा अन्त पाटते धरा।
दृष्टादृष्ट वद्य वरा न करिता, दोघे करावी उभी।
वाजंञे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम।
कुर्या सदा मंगलम…*”शुभमंगल सावधान….”*

लग्न घटी समीप येते…मंगलाष्टके संपतात अन् शुभमंगल सावधान म्हणताच…हळद, कुंकू नानाविध रंगांनी रंगलेल्या अक्षता वधू वरांच्या डोईवरून सर्वांगाला नाजूक स्पर्श करत धरणीवर विसावतात…अंग शहारून जातं…काटे उभे राहतात…वाजंत्री सुमधुर सनई चौघड्याचा गलबलाट करतात… अंतरपाट दूर होतो… वधू वरांची नजरानजर होते…मनातल्या मनात खुशीच्या लाटा हृदयावर धडकतात…एकमेकांस पुष्पहार घालण्यास आतुरतात… तो क्षण म्हणजे आयुष्याच्या एका टप्प्यावरून एक पायरी चढून नव्या सांसारिक जीवनाची वाटचाल…!
होम हवन…नाना विधी सुरू होतात…लग्न सोहळा पार पडत असतानाच तारुण्यात आलेल्या कुणा मुला मुलीला लागलेली असते…आपल्या लग्नाची घाई…! कुणाच्या आई वडिलांचे डोळे लागतात योग्य स्थळ शोधण्याकडे…
ओळखीची… अनोळखी साऱ्यांशी होते सलगी… आपल्या मुला मुलीचे गुण आपल्याच तोंडून असे काय उधळतात जशी पहाटे पहाटे झाडावरून बरसतात प्राजक्ताची फुले… सौंदर्याचे वर्णन म्हणजे इंद्राच्या दरबारीची मेनका… उर्वशीच…! कुणालाही आवडेल असं स्थळ असतं…पण नकार देखील बरेच झेललेले… तरी देखील म्हणणार..
*आई माझ्या लग्नाची गं…*
*का तुलाच पडली घाई…*
*कुणीतरी…*
*अहो कुणीतरी समजावा ना बाई*
*माझं वय काय झालंच नाही..*
काहीच वर्षे आपल्या जन्मदात्या आई वडिलांकडे…भावांडांसमवेत राहण्याची संधी मिळत असल्याने खरंच…मुलीला आपलं वय झालंच नाही असं वाटतं…
मुलगी पहायला जाणं हा तर नेत्र सुखद सोहळाच… !
दारात उभ्या राहिलेल्या गाडीतून उतरणाऱ्या प्रत्येकावर तिची नजर खिळलेली असते…ती तिच्या खोलीतील खिडकीच्या छोट्याशा झरोक्यातून…!
तो उतरतो…पेहराव कसा आहे…? मॉडर्न आहे ना..? स्वतःलाच प्रश्न विचारते…
कसा दिसतो…? सल्लू की शाहरुख…? की…निर्विकार अजय देवगण…?
त्याच्याही मनात कॅडबरीचे लड्डू फुटत असतात… कुणीतरी खिडकीतून डोकावताना दिसते…अन् पहिला लड्डू फुटतो… हात थरथरत ट्रे आणताना… ट्रे मधील कपबशितून संगीताचे सुरेल स्वर वाजवीत… सुंदर गुलाबी साडीत ती समोर येते… नजरा नजर होते अन्…दुसरा लड्डू फुटतो… काहीही न बोलता ती कप पुढे करते… कप घेताना हलकासा तिच्या कोमल बोटांचा स्पर्श होतो अन् स्वर्ग केवळ दोनच बोटे दूर राहतो…
समोरील खुर्चीत ती बसते…
पाहण्याची हिम्मत कुठे उरते…?
कुणाही नकळत चोरून कटाक्ष टाकतो
अन् तिच्या रुपावर, सौंदर्यावर भाळतो…लट्टू होतो…
थोरामोठ्यांच्या समोर प्रश्नोत्तराचा तास तर घाम फोडतो…
नाव माहिती असतंच अगदी गाव अन् तिचा ठाव सुद्धा…
तरीही प्रश्न येतोच…
नाव काय…?
काय काय आवडी आहेत…? काय काय करायला येतं..?
चहा देखील येत नसला तरी तेव्हा ती सुगरण असते…
पोहे आईने केलेले असतात पण…
तिथे कार्यक्रमात म्हणे…हिनेच केलेत…!
घरी पोहे नावडते… पण तिने केलेत म्हणून तो…एक एक दाणा चमच्याने वेचून खातो…
तिच्या चेहऱ्याकडे पाहत तिच्याच स्वप्नात रमतो…

“पसंत आहे का…?”
कडक आवाजातील बाबांच्या प्रश्नाने भानावर येतो…
मान डोलवत होकार देऊन टाकतो…
ती लाजून… चेहरा ओंजळीत लपवीत घरात पळते…
तिच्या हसण्या…लाजण्यातच तिचे उत्तर दडलेले असते…
आता दोघांच्याही मनात कॅडबरीचे लड्डू फुटू लागतात…
कित्तीही नाही म्हटलं तरी…देणेघेणे, हॉल भाडे, जेवणावळी सारे व्यवहार व्यावहारिकपणे झाले की साखरपुडा तारीख ठरते… अर्ध लग्न तर आजकाल तिथेच आटोपतं… कारण नंतर लग्न ठरलेलं जोडपं फिरायला…नव्हे नव्हे…कायदेशीर डेटिंग साठी मोकळं होतं…!

लग्नाचे दिवस जसजसे जवळ येतात…तसतसे वधू वरापेक्षा लग्नात बोवळणारेच जास्त तेजीत दिसतात…संगीताचा कार्यक्रम म्हणजे…नाच गाणी आणि धमाल… हळदी समारंभ प्रसंगी वेगळा पिवळा कुर्ता… पिवळ्या साड्या… मेंदी समारंभ करिता हिरव्या साड्या… म्हणजे जणू ऋतू बदलतात तशी वस्त्र सुद्धा समारंभानुसार बदलत जातात… काका काकू..मामा मामी..आत्या… चुलत, मावस, आत्ये भावंडे सर्वांसाठी नवे कपडे काढले जातात…शिवले जातात…आजी साडी…मामा आहेर… कानपिळीसाठी शर्ट पिस… याला त्याला आदींना कपडे… मानपान सारं सारं करण्यात यजमान मेटाकुटीला येतात…पण लग्नाचा आनंद चेहऱ्यावर सुखाची…समाधानाची जणू बागच फुलवत जातो…

मंडप सजतो… पूर्वी बांबूच्या काठ्या बांधून मंडप उभा असायच्या…माडाच्या झावळ्या विणून आच्छादल्या जायच्या… आत गारवा मिळायचा… शेणाची सारवलेली जमीन…दारावर नवी तोरणे असायची… केळीची पोसवलेली दोन अख्खी झाडे मांडवाच्या दोन्ही बाजूला उभारली जायची… पोसवलेल्या केळीचं नम्रपणे झुकलेले केळफूल जणू येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचे आदराने झुकून नमस्काराने स्वागत करत उभे असते…
कसं आहे पहा ना…
केळीचं आयुष्य तिला तोडल्याने संपतं पण तरीही नम्रपणे ती हसतमुखाने दारावर येणाऱ्या सर्वांना अभिवादन करते…स्वागत करते…
किती छान कल्पना आहे ना…!
अंगणात घराच्या समोरील बाजूस आंब्याची आणि सावरीची फांदी एकत्र बांधली जाते… काटेरी सावर आंब्याच्या फांदीच्या मिठीत अलगद विसावते…
तिला सावरीचे काटे टोचत नसतील का…?
संसारात शब्दांचे काटे टोचले तरी गुण्यागोविंदाने एकत्र राहून संसार करायचा… असं तर सुचवत नसतील ना ते…?
आज सर्वकाही एका फोनवर रेडिमेड उभारले जाते… लग्नातील मांडवाची ती मजा उरली नाही… कपड्यांचा मांडव अन् पायाखाली सतरंज्या नाहीतर फरशी… मोठमोठे फ्लड लाईट्स….झगमगाट असतो फुकटचा…!
हळद लागल्यावर वधू वरांना मामा सावरीच्या काट्यांचा स्पर्श न होता निमातून काढतो…अन् कोयत्याच्या एका घावात सावरीच्या काट्यांची त्रिकुट बांधलेली काठी तोडून टाकतो… म्हणजे, संकट आलं तरी संकटातून बाहेर काढण्याचं वचन मामा देतो काय..?
एक एक लग्नापूर्वीच्या विधी पूर्ण केल्या जातात… अन् पाहुणे मंडळी यथेच्छ माटव जेवणाचा आस्वाद घेतात…

लग्नासाठी स्त्रियांना एका साडीत किंवा पुरुषांना एका पँट शर्ट…कुर्ता अन् कोटात भागत नाही… कितीतरी वर्षे स्वतःच्या लग्नात घातलेला कोट…, शालू, महागड्या साड्या अंगावरील मळ, धूळ झटकून कपाटातून बाहेर येतात… अन् सुटकेचा निःश्वास टाकतात…
अंगाला पाणी न लावताच स्वच्छ होतात… ड्रायक्लिनिंग होताच…
*”मेरी साडी तेरी साडी से ज्यादा चमकती हैं…!”*
असं मनातल्या मनात कुजबुजत अंगावर मिरवतात…
कोटाच्या खिशातून… नको असतानाही गुलाबाचे लाल फूल उगाचच येणाऱ्या जाणाऱ्याला डोकावून पाहत असते…पंख्याच्या वाऱ्यावर उडणाऱ्या टायचे टोक मध्येच फुलाच्या पाकळ्यांना छेडत उडत असतं… अंगातून घामाच्या धारा वाहतात… अन् हातातील पांढरा शुभ्र रुमाल अलगद गालावरून ओघळणारे मोती टिपत स्वतः भिजून चेहऱ्याला गोंजारत राहतो…
दुसरा हात प्रत्येकाशी हस्तांदोलन करत आपणच लग्नाचा सारा भार उचलला असेच भासवत असतो…

*स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं ।*….

*गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।*….

एक दोन मंगलाष्टके पार पडताच मुलीला आणण्याचे फर्मान सुटते…मुलीचा हात आपल्या हाती धरून मामा मुलीला घेऊन मंडपात येतो…
आई बापाच्या एका डोळ्यात आनंदाश्रू अन् दुसऱ्या डोळ्यात मुलगी परक्याचं धन होणार याचं दुःख डबडबलेलं असतं…बांध फुटताच ओसंडून वाहतं… साडीच्या पदराने डोळे पुसत आई नव्या जीवनाची पायरी चढणाऱ्या मुलीकडे पाहत राहते…दुःख लपवत बाप हसत हसत निरोप देतो…

लेक लाडकी माझिया घरची
आज जाहली मजला परकी…
सुखी ठेव तू तिला या संसारी
आठव येता मज लागे उचकी…

© दीपक पटेकर {दीपी}
सावंतवाडी
८४४६७४३१९६

 

👩‍💻🧑‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻🧑‍💻

*_प्रवेश सुरू.. प्रवेश सुरू… प्रवेश सुरू….._*🏃‍♀️🏃‍♂️

*स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायची सुवर्णसंधी*

*⚜️महेंद्रा ॲकॅडमी⚜️*

*🔰स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र🔰, सावंतवाडी*

*_🌎सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली एक विशेष चळवळ_*

*_♻️सिंधुदुर्ग जिल्हा हा 10 वी 12वी च्या परीक्षांच्या निकालाचा विचार करता अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण नंतर ही मुले कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये का दिसत नाहीत? स्पर्धापरीक्षांमध्ये आपला जिल्हा मागे का पडलाय? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आले आहे ? महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी._*
*_♻️आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिका-यांचा जिल्हा म्हणून नावारुपाला येईल याचे सर्वतोपरी प्रयत्न महेंद्रा अकॅडमी तर्फे केले जातील._*

*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*

*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) व सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरती*

*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2023*

*3.🔰 सर्व प्रकारच्या बँकिंग परीक्षा स्पेशल बॅच -2023*

🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*

*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:

*📌अनुभवी शिक्षकवर्ग.*
*📌सुसज्ज वाचनालय.📚📚*
*📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.*
*🏠निट व स्वच्छ वर्ग.*
*📌पिण्याचा पाण्याची सोय.*
*📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.*
*📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.*
*📌अनोखी शिकवण्याची पद्धत*

*_👉आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा._*
*_”मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या._*

*अधिक माहितीसाठी संपर्क करा*

*📲7350219093*
*📲9022686944*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − seven =