You are currently viewing वरवडे श्री देव भैरवनाथ मंदिराचा कलशारोहण सोहळा भक्तीमय वातावरणात

वरवडे श्री देव भैरवनाथ मंदिराचा कलशारोहण सोहळा भक्तीमय वातावरणात

८ वर्षाच्या बालकाने केले कलशारोहण

 

कणकवली :

 

वरवडे (कणकवली) येथील श्री देव भैरनाथ मंदिराचा कलशारोहण सोहळा रविवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. अबाल वृद्धांसह महिलांनी या सोहळ्याचे क्षण टिपण्यासाठी गर्दी केली होती.

सकाळी मंदिरात होम हवन त्यानंतर मोठ्या भक्तीमय वातावरणात कलशाचे पूजन करण्यात आले. मंदिराच्या भोवती ढोल ताशांच्या गजरात कलशाची तरंगकाठी देवांच्या साक्षीने मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने कलश मंदिरावर चढविण्यात आला. ८ वर्षाच्या मुलाकडून कलशारोहण करण्यात आले. दरम्यान वरवडे गावचे मूळचे रहिवाशी असलेले आमदार नितेश राणे यांनीही आवर्जून कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती दर्शविली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 7 =