देवगड तालुक्यातील तारा स्पोर्ट्स तारमुंबरी क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या वार्षिक कला क्रीडाचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
खेळ कोणताही असो, खेळ खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ ही एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळले पाहिजे. खेळामुळे चपळता वाढते.. आज जगभरात विविध स्तरांवर विविध खेळ खेळले जातात. आणि सोबतच आपला व्यक्तिमत्त्व विकास घडतो. खेळ हा शालेय जीवनासाठी महत्त्वाचा आहे.खेळामुळे मानसिक स्वास्थ्य लाभते ,असे गौरवोद्गार तहसीलदार स्वाती देसाई यांनी पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी देवगड येथे व्यक्त केले.
तारा स्पोर्ट्स तारमुंबरी क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या वार्षिक कला क्रीडाचा शुभारंभ व पारितोषिक वितरण समारंभ
आणि सेवा क्षेत्राचा ग्रामीण भागातील शालेय गटा पासून खुल्या गटातील मुले आणि महिलांच्या विविध स्पर्धा ११ व १२ मे २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
या दिवशी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन संयोजकाकडून करण्यात आले होते. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिं ,11 मे रोजी
शिवप्रतिमा पूजन अध्यक्षा मनीषा सतीश धुरत यांनी केले. त्यानंतर धावणे, उलट चालणे, स्लो सायकल, पोहणे स्पर्धा
गोणता उडी, फुगा फोडणे या स्पर्धेला प्रारंभ झाला.
१२ मे रोजी सकाळी
९.३० वाजता क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या खेळात
रस्सी खेच, चमचा गोटी
फनी गेम्स, संगीत खुर्चीचा खेळ आयोजित करण्यात आला होता.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा व रेकॉर्ड डान्स आणि एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पारितोषिक वितरण सोहळ्याला निवृत भारतीय फौजी चंद्रशेखर खवळे उपस्थित होते .
स्पर्धांमध्ये विजेत्या मुलांना आणि महिलांना आकर्षक बक्षीस देण्यात आली.त्यानंतर मुलांचे रेकॉर्ड डान्स आणि विजय हरम लिखित व दिग्दर्शित सामाजिक एकांकिका सादरीकरण करण्यात आले .
तारा स्पोर्ट्स तारमुंबरी
गेली ३५ वर्षे कार्यरत असून
यावेळी, तारा स्पोर्ट्स क्लब, तारा मुंबरीतील गावातील विजयी व उपविजेत्या खेळाडूचा यथोचित सन्मान तहसीलदार स्वाती देसाई यांच्या हस्ते करण्यात आला,
याप्रसंगी, देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे , जेष्ठ पत्रकार व समाजसेवक प्रमोद कांदळगावकर आणि श्री विठ्ठल रखुमाई मंदिर विश्वस्त मंडळ अध्यक्ष सूर्यकांत जोशी हे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे तारा स्पोर्ट तारा मुंबरी क्लबच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तारा स्पोर्ट्स तारामुंबरी क्लबचे अध्यक्ष सतीश रामचंद्र धुरत यांनी गेल्या 35 वर्षाचा आढावा आपल्या प्रस्तावनेमध्ये मांडला.
याप्रसंगी, उपाध्यक्ष देविदास परब सचिव जागृत जोशी ,कोषाध्यक्ष नितीन चोपडेकर आणि इतर सदस्य उपस्थित होते .