You are currently viewing २७ व २८ मे रोजी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची पहिली जिल्हास्तरीय मानांकन स्पर्धा

२७ व २८ मे रोजी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची पहिली जिल्हास्तरीय मानांकन स्पर्धा

सावंतवाडी :

 

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची २०२३-२४ ची पहिली जिल्हास्तरीय मानांकन स्पर्धा दि २७ व २८ मे २०२३ रोजी कळसुलकर इंग्लीश स्कूल, सावंतवाडी येथे होणार आहे.

ही स्पर्धा जिल्हास्तरीय खुल्या गटात ( पुरुष व महिला ) खेळवण्यात येणार आहे.

ह्या स्पर्धेमधे सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी सन २०२३-२४ चे जिल्हा खेळाडू नोंदणी शुल्क रु. १००/- व स्पर्धा प्रवेश फी रु १५०/- ( १८ वर्षांखालील मुले/ मुली रु. १००/- ) सह खालील तालुका प्रतिनिधींकडे द्यावी.

सावंतवाडी : श्री. राजेश निर्गुण

कुडाळ : श्री शुकाचार्य म्हाडेश्वर

वेंगुर्ला : श्री ओंकार कुबल

कणकवली : श्री पांडुरंग पाताडे

देवगड : श्री प्रकाश प्रभू.

प्रतिक्रिया व्यक्त करा