You are currently viewing फोंडाघाट मध्ये तीन जनावरे दगावली…

फोंडाघाट मध्ये तीन जनावरे दगावली…

कणकवली

तालुक्यातील फोंडाघाट – गांगोवाडी मध्ये काल अचानक संध्याकाळी तीन जनावरांचा मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी कृषी सभापती संदेश पटेल यांनी फोंडा – कणकवली येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना फोनवरून पाचारण केले. मात्र ते येण्यापूर्वीच बाळा खांबाळेकर यांचा बैल, अशोक जोईल यांची गाय आणि बाळकृष्ण सावंत यांची गाय मृत झाली होती. विलास गुरव आणि दामोदर सावंत यांच्या अत्यावस्तव जनावरांवर तातडीने सलाईन – औषधोपचार करून निगराणी खाली ठेवण्यात आल्याने ती दगावली नाहीत.
वाडीतील शेतकरी जनावरे नेहमीप्रमाणे चरावयास सोडतात. युरिया सदृश्यपदार्थ खाल्ल्याने जनावरांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टर महेश चौगुले यांनी व्यक्त केला. त्यांचे सोबत डॉक्टर किरण वैद्य, डॉक्टर नातू,परिचारक गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच पुढील आठ दिवसात जनावरांना चरण्यासाठी न सोडता,बांधून ठेवावे अशी दवंडी देण्याची सूचना शेतकऱ्यांना आणि ग्रामपंचायतीला त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा सतर्क राहून वेळप्रसंगी संपर्क साधावा, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी टीमने केले आहे. शेतीच्या तोंडावर आलेल्या या अस्मानी संकटाने शेतकरी पूर्ण धास्तावला असून,प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

.

प्रतिक्रिया व्यक्त करा