अखेर ‘त्या’ संकुलातील नागरिकांची माकडाच्या त्रासातून सुटका

अखेर ‘त्या’ संकुलातील नागरिकांची माकडाच्या त्रासातून सुटका

वेंगुर्ला
वेंगुर्ला शहरातील मायबोली अपार्टमेंट परिसरामध्ये मागील ८ ते १० महिन्यापासुन वन्यप्राणी माकडाचा अतोनात उपद्रव सुरु होता. परिसरातील लहान मुलांवर महिला व वृद्ध लोकांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना ओरबाडणे तसेच घरातील मौल्यवान वस्तुंची तोडफोड करणे, खिडक्यांच्या काचा फोडणे इत्यादी हे नित्याचे झालेले होते. अखेर वनवृत्त कोल्हापूरचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.संतोष वाळवेकर व रेस्क्युटीमच्या सलग ५ दिवसांच्या प्रयत्नानंतर वनविभागाने बचावपथक व स्थानिकांच्या साहयाने वानराच्या नेहमीच्या वावराच्या ठिकाणी पिंजरा लावून त्यास यशस्वीपणे ताब्यात घेतले. त्याची पशुवैद्यकिय अधिकारी यांचेकडुन वैद्यकिय तपासणी करुन त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

अखेर वनक्षेत्रपाल (प्रा.), कुडाळ यांनी मा उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाने वनवृत्त कोल्हापूरचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.संतोष वाळवेकर व त्यांचे टीमला रेस्क्युसाठी बोलावले. सलग पाच दिवसांच्या प्रयत्नानंतर वनविभागाने बचावपथक व स्थानिकांच्या साहयाने वानराच्या नेहमीच्या वावराच्या ठिकाणी पिंजरा लावून त्यास यशस्वीपणे ताब्यात घेतले. त्याची पशुवैद्यकिय अधिकारी यांचेकडुन वैद्यकिय तपासणी करुन त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सदर वानराच्या रेस्क्यू मध्ये कुडाळ येथील वनक्षेत्रपाल श्री.अमृत शिंदे यांनी यांनी श्री.एस.डी.नारनवर, उपवनसंरक्षक, वनविभाग सावंतवाडी तसेच श्री.आय.डी.जालगांवकर, सहा. वनसंरक्षक, सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली वनवृत्त कोल्हापूरचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.संतोष वाळवेकर, वनपाल मठ श्री.अ.स.चव्हाण, वनरक्षक श्री.विष्णू नरळे, बचाव पथक सदस्य अमित कुंभार, समर्थ कराळे, आकाश भोई, अनिल ढोले, कोकण वाइल्डलाइफ रेस्क्यु फोरम, सिंधुदूर्गचे सदस्य अनिल गावडे, महेश राऊळ, नाथा वेंगुर्लेकर, वैभव अमृसकर तसेच स्थानिक रहिवाशी का.ऊ. शेख, श्री.कोचरेकर, श्री.दिलीप मालवणकर, श्री.भोगटे, श्री.निलेश तांडेल, श्री. प्रशांत नेरुरकर, श्री.अंब्रिश मांजरेकर यांनी यशस्वी केले असून त्याबाबत नगरसेविका सुमन निकम व नगरसेवक संदेश निकम तसेच स्थानिक सहिवासी यांनी वनविभाग व बचाव पथकाचे वेळीच दखल घेवून रेस्क्यु केल्याने आभार व्यक्त केले.
मायबोली अपार्टमेंट परिसर या वानरामुळे त्रस्त होते. सदर प्रकरणाबाबत नगरसेविका सुमन निकम, नगरसेवक संदेश निकम यांनी मुख्याधिकारी श्री.अमितकुमार सोंडगे यांच्या माध्यमातुन वनविभागास माहिती दिली. त्यानुसार कुडाळ वनपरिक्षेत्रा मार्फत सातत्याने त्या वानरास पकडणेसाठी प्रयत्न चालू होते. परिसरात अन्य उंच अपार्टमेंट तसेच लागुनच दाट झाडी असल्याने वानर हुलकावणी देत होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा