You are currently viewing ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम व आर्ट गॅलरीचा 17 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम व आर्ट गॅलरीचा 17 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

कुडाळ:

ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम व आर्ट गॅलरीचा 17 वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पिंगुळी येथे दि. ३ मे २०२३ रोजी पार पडला. यावेळी सकाळचे सत्रात ठाकर समाजाचा वधु वर सुचक पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास ठाकर समाजातील वधु वरांनी नोंदणी करणेकामी उपस्थिती दाखविली. सायंकाळी ७.०० वाजता कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा पार पडला.

यावेळी मा श्री अरुण दाभोलकर ज्येष्ट चित्रकार पद्मश्री परशुराम गंगावणे, मा श्री अजय आकेरकर सरपंच ग्रा पं पिंगुळी, मोहन होडावडेकर, श्री भगवान रणसिंग श्री प्रकाश पांगुळ, मनिषा मस्के चेतन गंगावणे दादा मसके इ. उपस्थित होते. यावेळी संस्थेचे वतीने देण्यात येणारा *शरद गरुड स्मृती कला पुरस्कार २०२३ ज्येष्ट भजनी बुवा श्री भालचंद्र केळुसकर यांना देण्यात आला. भजन क्षेत्रातील त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामाबद्दल हा पुरस्कार त्यांना देणेत आला. तसेच संस्थेच्या वतीने या वर्षी *श्री ओमप्रकाश चव्हाण, श्री विजय पालकर, श्री किरण खोत, श्री उमेश गाळवणकर यांना कोकणरत्न सन्मान २०२३* हा पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले.

नवनिर्वाचित पिंगुळी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा सत्कार संस्था अध्यक्ष पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते करण्यात आला. सावली ग्रामसंघ मधील स्वयंसहायता समुह यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मा श्री वैभव खानोलकर यांनी केले. प्रास्ताविक एकनाथ गंगावणे यांनी केले. रात्री ठिक १०.०० वाजता तेडोलकर दशावतार नाट्यमंडळ झाराप यांचे पुण्यप्रभाव हे नाटक सादर करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा