You are currently viewing मनसेकडे एक हाती सत्ता दया, सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील – यश सरदेसाई

मनसेकडे एक हाती सत्ता दया, सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील – यश सरदेसाई

मनसेकडे एक हाती सत्ता दया, सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील – यश सरदेसाई

सावंतवाडीत आयोजित मेळाव्यात अनेकांचा प्रवेश…

सावंतवाडी

विद्यार्थ्यांचे प्रश्न हे आमच्याकडून सुटतच आहेत, पण जेव्हा मनसेच्या हाती एक हाती सत्ता येईल तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, बस सेवा अशा विविध समस्या मार्गी लागतील, असे प्रतिपादन मनसे विद्यार्थी सेना राज्य मुख्य संघटन यश सरदेसाई यांनी केले.

सिंधुदुर्ग दौऱ्या दरम्यान सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीत ३५ विद्यार्थ्यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी मनसे कामगार सेना राज्य सरचिटणीस गजानन राणे, जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ, जिल्हा सचिव गुरूदास गवंडे, तालुकाअध्यक्ष मिलींद सावंत, न्हावेली विभाग अध्यक्ष अक्षय पार्सेकर, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, उपतालुकाअध्यक्ष सुनिल आसवेकर, बांदा विभाग अध्यक्ष विष्णू वसकर, आंबोली विभाग अध्यक्ष काशीराम गावडे, बांदा शहर अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, सुयोग राऊळ, सावंतवाडी तालुका विध्यार्थी सेना संपर्क अध्यक्ष सचिन पाटणकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, रसिका पालव आदी उपस्थिती होते.

यावेळी साहिल तळकटकर, प्रतीक मालवणकर, अमोल नाईक, दिपाली राऊळ, संध्या पाताडे, मानसी परब, शमिका सावंत, निकेश पेडणेकर, मिथुन राठोड, गोविंद माईनकर, चित्रा तांडेल, सोनाली शेळके, सुनीता सावंत, ऐश्वर्या चव्हाण, वैभवी न्हावेलकर, दीक्षा कोळेकर, हर्षदा कासकर, वैदेही मांजरेकर, वैष्णवी न्हावेलकर, सुनिधी मराठे, नितेश दळवी, वंश नाईक, शुभम बांदेकर आदींनी पक्षात प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा