You are currently viewing तिलारीच्या विकासाची लवकरच गुड न्यूज इथल्या युवकांना मिळेल..

तिलारीच्या विकासाची लवकरच गुड न्यूज इथल्या युवकांना मिळेल..

मंत्री दीपक केसरकर यांची केर येथे ग्वाही..!

दोडामार्ग

तिलारीचा पर्यटन विकास व्हावा ही इथल्या युवकांची मागणी आहे तिला मूर्त स्वरूप लवकरच येईल त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपली आणि काही महत्वाच्या व्यक्तींची बैठक आहे त्यामुळे लवकरच तिलारीच्या विकासाची लवकरच गुड न्यूज इथल्या युवकांना मिळेल अशी ग्वाही शालेयशिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली
केर येथे श्री देव कुलपुरुष वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांच्यासमवेत तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुका संघटक गोपाळ गवस, केर भेकुर्ली सरपंच रुक्मिणी नाईक, मिरवेल सरपंच श्री. बाणे, तहसीलदार अरुण खानोलकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा