You are currently viewing १० मे रोजी उभादांडा श्री केपादेवी मातेचा वर्धापन दिन

१० मे रोजी उभादांडा श्री केपादेवी मातेचा वर्धापन दिन

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा मुठवाडी येथील श्री केपादेवी मातेचा नववा वर्धापन दिन तसेच धार्मिक विधी कार्यक्रम सोहळा दिनांक १० मे २०२३ रोजी संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम सकाळी ८ ते १० यावेळी श्री केपादेवी मातेचा अभिषेक व सकाळी १० ते १२ श्री. सत्यनारायण महापूजा होणार आहे. दुपारी १२ ते १२:३० या वेळेत श्री सत्यनारायण महाआरती त्यानंतर १२:३० ते ४ महाप्रसाद व सायं. ४ ते ७ वा. सुश्राव्य भजन तर रात्र १० वाजता यक्षिणी दशावतार नाट्य मंडळ, माणगांव यांचे महान दशावतारी नाट्य पुष्प “प्रयाग तीर्थ” सादर होणार आहे.

तरी सदर कार्यक्रमाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असे आग्रहाचे निमंत्रण श्री केपादेवी देवस्थान कमिटी व विश्वस्त तसेच श्री केपादेवी देवस्थान उत्सव उपसमिती, मूठ उभादांडा यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच ज्या भक्तांना महाप्रसादा साठी आर्थिक मदत किंवा वस्तुरूपाने शिधा द्यायची असेल तर त्यांनी रमाकांत गिरप व नारायण गिरप यांच्याकडे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − five =