You are currently viewing श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे ची विद्यार्थिनी कु.नित्या विजय सावंत भारती विद्यापीठाच्या इंग्रजी एन्ट्रन्स परीक्षेत महाराष्ट्र राज्यात दुसरी…

श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे ची विद्यार्थिनी कु.नित्या विजय सावंत भारती विद्यापीठाच्या इंग्रजी एन्ट्रन्स परीक्षेत महाराष्ट्र राज्यात दुसरी…

वेंगुर्ले

भारती विद्यापीठातर्फे फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इंग्रजी बहीस्थ परीक्षेत श्री देवी सातेरी हायस्कूलमधील इयत्ता ७ वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी कु. नित्या विजय सावंत हीने इंग्रजी एन्ट्रन्स परीक्षेत १०० पैकी ९८ गुण मिळवून राज्यात व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तिला प्रशालेतील इंग्रजी विषय शिक्षक श्री.पांडुरंग वगरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या तिच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक समितीचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री.दिगंबर नाईक, कार्यवाह श्री.प्रभाकर नाईक, मुख्याध्यापक श्री.संजय परब सर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − 1 =