You are currently viewing मच्छिन्द्र कांबळी यांचे स्मारक 1 वर्षात पूर्ण होणार…

मच्छिन्द्र कांबळी यांचे स्मारक 1 वर्षात पूर्ण होणार…

पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी
कुडाळ येथे उभारण्यात येत असलेले माच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक 1वर्षात पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यानी केले. मच्छिन्द्र कांबळी यांच्या रेवंडी या गावी मोबाईल टॉवरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संजय पडते, जि.प. सदस्य नागेंद्र परब,सरपंच प्रिया कंबळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
कोणावरही टीका करण्यापेक्षा विकासकामे महत्वाची असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, सी.आर.झेड. बाबत ग्रामस्थांच्या मगण्या व म्हणणे या बाबत शिफारस करू. स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे ही माझी भुमिका आहे. गावतील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग सोबत आहेत. वैद्यकीय महाविद्यलयासाठी मी त्यांचे आभार मानतो. चांगले वाईट जिल्हावासियांना समजते. मी ही सिंधुदुर्गचा सुपुत्र आहे. त्यामूळे जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री श्री सामंत म्हणाले.

या वेळी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांची यथोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या सुरवातीस पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोबाईल टॉवरचे उद्घाटन झाले. जिल्ह्यात मंजूर झालेल्या बी.एस.एन.एल. च्या एकूण 104 टॉवरपैकी 67 व्या टॉवरचे आज उद्घाटन झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + eight =