You are currently viewing “देव्हाऱ्याची जागा आता पुस्तकांच्या कपाटाने घ्यायला हवी!” – गिरीश प्रभुणे

“देव्हाऱ्याची जागा आता पुस्तकांच्या कपाटाने घ्यायला हवी!” – गिरीश प्रभुणे

*”देव्हाऱ्याची जागा आता पुस्तकांच्या कपाटाने घ्यायला हवी!” – गिरीश प्रभुणे*

पिंपरी

“देव्हाऱ्याची जागा आता पुस्तकांच्या कपाटाने घ्यायला हवी!” असे मत ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी संत तुकाराम प्रतिष्ठान मंदिर प्रांगण, संत तुकारामनगर, पिंपरी येथे शनिवार, दिनांक ०६ मे २०२३ रोजी व्यक्त केले.‌ अक्षरग्रंथ या संस्थेच्या वतीने दिनांक ०६ मे ते १४ मे २०२३ या कालावधीसाठी आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची व्यासपीठावर तसेच माजी नगरसेवक वसंत शेवडे, ज्येष्ठ कवी निशिकांत गोडबोले, श्यामराव सरकाळे यांची यावेळी रसिकांमध्ये प्रमुख उपस्थिती होती.

श्रीकांत चौगुले यांनी आपल्या मनोगतातून, “राजर्षी शाहूमहाराज यांनी महाराष्ट्रात सर्वात प्रथम फिरते वाचनालय सुरू करून वाचनचळवळीचा पाया घातला!” अशी माहिती दिली. वीस नामवंत प्रकाशनाच्या सुमारे दहा हजार पुस्तकं असलेल्या या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करताना गिरीश प्रभुणे यांनी लहान मुलांना आवडलेली पुस्तकं खरेदी करून त्यांना बक्षीस म्हणून दिल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला.

चित्रसेन गोलतकर यांनी स्वागत केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. पौर्णिमा गोलतकर यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*ऑफर… ऑफर….. ऑफर….💃💃*

*_कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी पार्क गृह प्रकल्पात ग्राहकांना मिळणार ” ऑफर”…_*

*_१६ लाखात १ बीएचके, तर २७ लाखात २ बीएचके फ्लॅट; दुकान गाळा फक्त १० लाखात…_*
ऑफर*

*🥳पुन्हा एकदा कुडाळ शहरात १६ लाखात फ्लॅट घेण्याची संधी…!💃*

*_🥰आता आमची नवी ओळख “छत्रपती शिवाजी पार्क”…🥰_*

*ग्राहकांच्या उत्स्फूर्त😍 प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलो🤩 आहोत…! खास *दसरा🎊 ऑफर…!😍🥳💃*

*मंदी नही…! 😍ये संधी है…!🤩*

*_🏡 छत्रपती शिवाजी पार्क🌴_*
*_🌴गृहप्रकल्प-कुडाळ🏡_*

*👉 घेऊन आले आहेत…!स्मार्टसिटीच्या 🛣️ वाटेवर असलेल्या कुडाळात मध्यवर्ती भागात तयार ताबा 1BHK फ्लॅट फक्त १६ लाखात, 2 BHK फ्लॅट फक्त २७ लाखात तोही GST सह, तर १० लाखात मिळावा दुकान गाळा…!*

👉 *_पहिल्या पाच ग्राहकांना ही संधी…😍🥳🤩_*

*आठ बिल्डिंगच्या🏬 भव्य-दिव्य गृह प्रकल्पा 🏡 सोबत १५ हजार स्क्वेअर फूट गार्डन🏕️,गणेश मंदिर🛕,स्विमिंग पूल🗾,क्लब हाउस🏸,जिम 💪आणि प्रशस्त पार्किंगची🚘 सुविधा…!*💃

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी २५० ची मेगा टाऊनशिप…🏬*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून चालत फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर…🚆*
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🛑 मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

*🏡 आमचा पत्ता:- साईट शिवाजी पार्क,सत्कार हॉटेल रोड,जुना बस स्टँड समोर,कुडाळ*

*📲 संपर्क :- **९४२२३७९३९९*
*९४२२०६५१८१*
*९४०४७५१५००*
_______________________

प्रतिक्रिया व्यक्त करा