You are currently viewing बांदा केंद्र शाळेच्या ‘सोनेरी क्षण’ पुस्तिकेचे प्रकाशन

बांदा केंद्र शाळेच्या ‘सोनेरी क्षण’ पुस्तिकेचे प्रकाशन

उपशिक्षक जे.डी.पाटील यांनी केले संकलन

*बांदा*

उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक मिळविलेल्या जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेतील यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे शाळेतील उपशिक्षक श्री जे.डी.पाटील यांनी संकलन केलेल्या सोनेरी क्षण या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपकभाई केसरकर व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
बांदा नं.१केंद्रशाळेत नुकताच राज्यस्तरीय शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले‌. यावेळी शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांनी बांदा केंद्र शाळेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविले जात असून शाळेत राबविले जाणारे‌ उपक्रम हे प्रेरणादायी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणारे आहेत या शाळेला राज्यातील रोल माॅडेल बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या शाळेच्या उपक्रमांची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे प्रकाशित केलेल्या गुणी शिक्षक गुणवंत शाळा या पुस्तिकेतही बांदा केंद्र शाळेच्या यशोगाथेचा समावेश केला आहे याचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.


यावेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, राज्य प्रकल्प संचालक केदार पगारे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, डाएटच्या प्राचार्या अनुपमा तवशीकर,प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, योजना शिक्षणाधिकारी प्रदिपकुमार कुडाळकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपसरपंच जावेद खतीब, तहसीलदार अरूण उंडे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे,शोभराज शेर्लेकर , गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगांवकर, केंद्र प्रमुख संदीप गवस, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकरआदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम व शामसुंदर सावंत यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा