You are currently viewing शिवापूर-शिरशिंगे रस्त्याच प्रश्न सुटला

शिवापूर-शिरशिंगे रस्त्याच प्रश्न सुटला

*निलेश राणे यांची यशस्वी शिष्टाई, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश..*

 

कुडाळ :

कुडाळ व सावंतवाडी तालुक्यांना जोडणारा शिवापूर शिरशिंगे रस्ता गेली अनेक वर्षे वनविभागाच्या जाचक अटींमुळे रखडला होता. गेल्या आठ वर्षात या प्रश्नावर अनेकवेळा आंदोलन उपोषण झाली मात्र हा प्रश्न अधांतरीच होता. शिवापूर शिरशिंगे रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती मोहन सावंत यांनी १ मे रोजी उपोषण केलं होतं. त्या नंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी आपण यातून लवकरात लवकर मार्ग काढू अस आश्वासन दिलं होतं. त्या नंतर निलेश राणे यांच्या विनंतीवरून आज या प्रश्नासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे वनविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधीत ग्रामस्थ यांची एकत्रित बैठक आज पार पडली. यावेळी या विषयात कायमस्वरूपी रस्ता चालू करण्याची मागणी निलेश राणेंनी केली. त्यावर पालकमंत्र्यांच्या रवींद्र चव्हाण यांनी कार्यकारी अभियंता अनामिक जाधव यांना त्वरित निविदा प्रक्रिया करत पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे शिवापूर शिरशिंगे या प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मिटला असून लवकरच हा रस्ता पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा