You are currently viewing वडाचापाट ग्रामपंचायत येथे गॅस सिलेंडर आणि शेगडीचे वितरण

वडाचापाट ग्रामपंचायत येथे गॅस सिलेंडर आणि शेगडीचे वितरण

मालवण :

 

वडाचापाट ग्रामपंचायत येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त झालेल्या गॅस सिलेंडर आणि शेगडीचे वितरण माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई आणि सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभूदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. गॅस कनेक्शन अभावी महिला चुलीवर जेवण बनवतात. त्यामुळे जंगल तोड केली जाते. तसेच चुलीवर जेवण बनवल्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर त्या चुलीच्या धुराचा त्रास होतो व ते दम्या सारख्या आजारांना बळी पडतात. या सर्व गोष्टींचा विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांनी संपूर्ण भारतात उज्वला गॅस योजना सुरु केली आहे. वडाचापाट गावातील या योजने अंतर्गत कनेक्शन मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मालवण येथे जाऊन शेगडी व सिलेंडर आणणे खर्चिक ठरणार होते. त्यामुळे या लाभार्थ्यांना वडाचापाट येथे सर्व साहित्य मिळेल अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई यांनी यावेळी दिली. सर्वसामान्यासाठी धावून येणाऱ्या वडाचापाट येथील देसाई कुटुंबियांचे लाभार्थ्यांनी यावेळी आभार मानले.

यावेळी उपसरपंच सचिन पाताडे, उद्योजक दयानंद देसाई, सदस्य विनायक प्रभुदेसाई, खरेदी विक्री संघाचे श्री मयेकर, रामचंद्र माळकर, दीपक पाताडे तसेच लाभार्थी ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा