You are currently viewing राजमाता पार्वतीदेवीनी त्या काळात महिलांचे विविध गट गावागावात निर्माण करून विकास साधण्याचा प्रयत्न केला –  सामाजीक कार्यकर्ते श्री अण्णा केसरकर

राजमाता पार्वतीदेवीनी त्या काळात महिलांचे विविध गट गावागावात निर्माण करून विकास साधण्याचा प्रयत्न केला –  सामाजीक कार्यकर्ते श्री अण्णा केसरकर

सावंतवाडी

सावंतवाडी संस्थान मध्ये आपल्या तेजोमय कर्तुत्वाने आपला ठसा उमटवलेल्या राज्यकर्त्या राजमाता श्रीमंत पार्वतीदेवी साहेब यांची 116 वी जयंती दि.1 मे रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले,संस्थेचे संचालक प्रा. डी टी देसाई,सहसंचालक अॅड. शामराव सावंत,सदस्य श्री जयप्रकाश सावंत, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वसंतराव तथा श्री अण्णा केसरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल यांनी केले. याप्रसंगी जीवशास्त्र विभाग प्रयोगशाळा परिचय श्री ज्ञानेश्वर तळकटकर यांना अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मराठी विषयातून नेट परीक्षा पास झालेल्या सौ दर्शना शिरोडकर ,बांदा पानवळ महाविद्यालय, मराठी विभाग यांचा तसेच श्री लक्ष्मण तळवणकर मराठी विषयामध्ये नेट परीक्षा पास केल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कारार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ डी एल भारमल यांनी केले.त्यांनी राजमाता श्रीमंत पार्वती देवीसाहेब यांच्या कार्याचा परिचय करून दिला.
प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते वसंतराव तथा श्री अण्णा केसरकर यांनी ग्रामीण भागातील जनतेला न्याय देण्यासाठी सामाजिक शैक्षणिक व आरोग्य सुविधा खेड्यापाड्यामध्ये सुरू करण्याचं श्रेय राजमाता पार्वतीदेवीना जाते. गावागावांमध्ये महिलांचे गट निर्माण करून विविध योजना राबविण्याचा प्रयत्न त्यांनी त्या काळामध्ये केला.ग्रामीण भागातील विद्यार्थीनीना रोजगार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील ग्रंथालयाला त्यांनी भरघोस आर्थिक मदत केली व विविध मौल्यवान ग्रंथ भेट दिले.
आपल्या अध्यक्षीय भाषणांमध्ये राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यानी
राजमाता पार्वतीदेवी साहेब यांनी त्या काळामध्ये आपल्या कार्याचा उत्तम ठसा उमटवला व लोककल्याणाच्या विविध योजना त्यांनी आपल्या संस्थानांमध्येा राबवल्या. विशेषः शैक्षणिक व आरोग्य सुविधा त्यांनी अनेक ठिकाणी निर्माण केल्या. व बापूसाहेब महाराजांना त्यांनी अनमोल अशी साथ दिली. असे सांगीतले
याप्रसंगी
महावाद्यालयातील कला वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना संस्था शिष्यवृत्ती तसेच विद्यार्थी निधी तथा एसए एफ फंडातून विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी कर्मचारी श्री मोरेश्वर पोतनीस यांनी राजमाता पार्वती देवीसाहेब यांच्या जीवनावरील कवितेचे गायन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. सौ प्रगती नाईक यांनी केले तर आभार प्रा. व्ही पी सोनाळकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा