सावंतवाडी
श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक संजय महापुरे हे आपल्या नियत वयोमनानुसार महाविद्यालया मधून निवृत्त झाले.त्यांनी महाविद्यालयामध्ये 31 वर्ष सेवा केली.यानिमित्त त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ.शुभदादेवी भोंसले ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल,आय.क्यु ए सी समन्वयक डॉ.बी एन हिरामणी, स्तवन महापुरे, महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल यांनी केले.त्यांनी प्रा. महापुरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी राणीसाहेब सौ.शुभदादेवी भोंसले व राजसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी प्रा.महापुरे यांनी महाविद्यालयासाठी 31 वर्षाची सेवा दिली याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. व त्यांच्या शाल व श्रीफळ देवुन सत्कार केला. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जी एम शिरोडकर ,इंग्रजी विभागाचे डॉ.बी एन हिरामणी, अर्थशास्त्र विभागाचे प्रा. टी व्ही कांबळे,प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रतीक्षा सावंत व प्राणिशास्राचे डॉ. जी एस मर्गज यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.व्ही.पी. राठोड यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.