*राष्ट्रीय लोकअदालतला उत्तम प्रतिसाद; लघुवाद न्यायालयात २८ प्रकरणे निकाली*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांला मुंबईतील लघुवाद न्यायालयात उत्तम प्रतिसाद मिळाला असून मुंबई येथील मुख्य शाखा आणि वांद्रे शाखा मिळून १९० पैकी २८ प्रकरणे निकालात काढली आहेत. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यातील न्यायप्रक्रियेतील कार्याला या उपक्रमामुळे गती येत असल्याचे दिसून येत आहे.
लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतचे काम यशस्वी झाले. अतिरिक्त मुख्य न्यायाधीश सर्वश्री एम. एस. पठाण, एस. एस. देशपांडे, न्यायाधीश सर्वश्री डी. एस. दाभाडे, एस. एस. कदम तसेच वकील किर्ती गोडबोले, पी. ए. ठाकेर यांनी काम पाहिले. या लोकअदालतचे यशस्वी आयोजन अप्पर प्रबंधक निलम शाहीर व अतुल राणे तसेच कर्मचारी वृंद यांनी केले.