You are currently viewing विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा – राजेंद्र पराडकर

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा – राजेंद्र पराडकर

आशिये ग्रामपंचायतच्यावतीने दहावी , बारावी गुणवंत विद्यार्थी गौरव

कणकवली

आशिये गावातून विद्यार्थी दहावी, बारावीत आता यशस्वी होत दुसऱ्या टप्यात पदार्पण करत आहेत. त्यांचे कौतुक करण्याचा अभिनव उपक्रम ग्रामस्थांनी आयोजित केला आहे.दहावी,बारावीत चांगले गुण मिळवलात, त्यामुळे आता तुमचा सत्कार झाला.आता गुणवंत विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली आहे, या यशाचे सातत्य ठेवलं पाहिजे.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा कडे आतापासूनच वळले पाहिजे.चांगला अभ्यास केलात तर यश निश्चित आहे.मात्र,विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात मोबाईलचा अतिवापर टाळावा,असा कानमंत्र सिंधुदुर्ग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी दिला.

आशिये येथे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील दहावी , बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प. सिंधुदुर्ग राजेंद्र पराडकर व मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व गुलाबपुष्प देत गुणवतांचा सत्कार करण्यात आला. तर कणकवली कॉलेज प्रा. सुरेश पाटील यांना विद्यार्थ्यांना दहावी,बारावी नंतर पुढे काय?या विषयावर व्याख्यान देत मार्गदर्शन केले.

यावेळी माजी उपसभापती महेश गुरव,आशिये सरपंच शारदा गुरव,उपसरपंच संदीप जाधव, माजी सरपंच शंकर गुरव,माजी उपसरपंच प्रवीण ठाकूर,समीरा ठाकूर ,शर्मिला गवाणकर,श्रीमती बागवे,बाळा बाणे,विलास खानोलकर, निलेश ठाकूर,सुनिल बाणे,संजय बाणे,संतोष जाधव,सचिन गुरव, उमेश ठाकूर,समीर ठाकूर,रविंद्र बाणे,रवींद्र गुरव,रामचंद्र बाणे,विजय मसुरकर,ग्रामसेवक राकेश गोळवणकर व ग्रामपंचायत कर्मचारी प्रिया कोरगावकर, दुर्वा जाधव आदीसह गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

राजेंद्र पराडकर म्हणाले,विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा मध्ये भविष्य उज्ज्वल आहे.चांगले अधिकारी बनण्याची क्षमता आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांनी जीवनात मोठं झाल्यावर आई वडिलांचे परिश्रम विसरुन चालणार नाही.आपल्या गावाचा अभिमान कायम ठेवला पाहिजे.शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी फेसबुक व व्हाट्सएपच्या प्रेमात पडू नये.त्यात गुंतू नका,जे काय करायचे आहे ते नोकरी मिळाल्यानंतर करा.आता स्पर्धात्मक युग आहे,त्यात मागे पडू नका.या गावातून यूपीएससी, एमपीएससी मध्ये एक तरी विद्यार्थी प्राविण्य मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

माजी उपसभापती महेश गुरव म्हणाले,आशिये या गावातील दहावी बारावीत ४० विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमतेचा चांगला वापर करत मेहनत केली पाहिजे. आशिये गावातील विद्यार्थी तालुका व जिल्ह्यात चमकले आहेत,त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द व कष्टाने आपली उन्नती साधावी.
प्रास्तविक करताना विलास खानोलकर म्हणाले,आशिये गावातील गुणवतांचा सन्मान आज करण्यात आला आहे.गावात यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान होणारा हा पहिला कार्यक्रम आहे.दहावी व बारावीत यश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्याचे सत्कार केल्याने जबाबदारी वाढली आहे.सूत्रसंचालन शिक्षक मंगेश लाड यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा