You are currently viewing कणकवलीत बॉक्स क्रिकेट स्टेडियम व फुटबॉल स्टेडियमचे लोकार्पण माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न

कणकवलीत बॉक्स क्रिकेट स्टेडियम व फुटबॉल स्टेडियमचे लोकार्पण माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न

कणकवली

आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी साकारण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट स्टेडियम व फुटबॉल स्टेडियमचे लोकार्पण माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी गडनदी किनाऱ्यावर स्वागत बोर्डचे उदघाटन केले. यावेळी ते बोलत होते.

अतिशय चांगला उपक्रम आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि त्या संकल्पना राबविण्याचे काम करणारे नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे माजी खासदार निलेश राणे यांनी कौतुक केले. नगरपंचायतचा कारभार जेव्हापासून मी पाहतोय तेव्हापासून आमदार नितेश राणे यांची संकल्पना आणि त्याला सहकार्य करण्याचे काम नगरपंचायत ची टीम करते. हे देखील कौतुकास्पद आहे.असे गौरवद्गार भाजपा प्रदेश सचिव,माजी खासदार निलेश राणे यांनी काढले.

जिल्ह्यात पाहिले तर असे उपक्रम कुठल्याच पालिकेत किंवा नगरपंचायत मध्ये काही प्रमाणात महानगरपालिकांमध्ये देखील होताना दिसत नाही. मुंबईत आम्ही पाहतो मात्र स्वतः नगरपालिकेने केलेले उपक्रम जे समाजाला आणि त्यांच्या गरजांना धरून त्यापैकी कणकवली नगरपंचायत आणि आमदार नितेश राणे सोन्या सारखे काम करता.हे महाराष्ट्रामध्ये एक नंबरचे आहे. असे उपक्रम महाराष्ट्रात कोणीच राबवत नाही.अनेक महानगरपालिका आणि त्यांच्या कारभार पाहिला पण कणकवली नगरपंचायत च्या सर्व टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे .असे गौरव गार माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना काढले.

पुढे बोलताना आमदार नितेश आणि म्हणाले जेव्हापासून फ्लाओवर तयार झाला तेव्हापासून कणकवलीकरांची एक इच्छा होती की या फ्लाय वर खाली काहीतरी वेगळ व्हावं जेणेकरून येथे विविध उपक्रम राबवता येतील त्यातील पहिला पाऊल म्हणजे शिवाजी महाराज चौक डेव्हलप केलं त्यामुळे तिथे विविध कार्यक्रम उपक्रम होऊ लागले फ्लाओवर खाली अतिक्रमण होण्यापेक्षा लोकांना विविध ऍक्टिव्हिटी करता येतील अशा सूचना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्या होत्या तसेच नवी मुंबई जे होऊ शकते ते आमच्या सिंधुदुर्ग तसेच कणकवलीत का होऊ शकत नाही यावर नागरिक देशांशी चर्चा केली आणि शक्य तेवढे पर्याय करून हे काम पूर्ण केले.

आमदार नितेश राणे म्हणाले,की निलेश राणेंना खेळाची आवड आहे.विविध खेळात निलेश राणे हे नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळे त्यांना येथे बोलून कणकवली साठी काहीतरी वेगळे येथे आणलेला आहे.इंडोर स्टेडियम मुळे खेळण्यासाठी खेळाडूंना स्टेडियम उपलब्ध झालेला आहे त्यामुळे विविध उपक्रम आजपर्यंत राबवण्यासाठी कणकवलीकरांनी जसे आजपर्यंत आशीर्वाद दिले तसेच याही पुढे देतील अशी अपेक्षाही आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक रवींद्र गायकवाड गटनेते संजय कामतेकर बंडू गांगण मेघा गांगण सुप्रिया नलावडे प्रतीक्षा सावंत उर्मी जाधव मेघा सावंत प्रज्ञा ढवण, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री शहराध्यक्ष अण्णा कोदे कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, तालुका उपाध्यक्ष संजना सदडेकर, राजश्री धुमाळे, प्राची कर्पे, महेश सावंत, शिशिर परूळेकर, अबीद नाईक, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, सचिन पारधीये, संजय मालकर साक्षी वाळके समीर प्रभू गावकर उपस्थित होत्व

प्रतिक्रिया व्यक्त करा