You are currently viewing किशोर सुतार यांजकडून मोफत आयडी कार्डचे वाटप

किशोर सुतार यांजकडून मोफत आयडी कार्डचे वाटप

किशोर सुतार यांजकडून मोफत आयडी कार्डचे वाटप

सचिन पाटील (अलिबाग)

अलिबाग:अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथील रा‌.जी.प.प्राथमिक मराठी शाळा व उर्दू शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना किशोर फोटोज चे किशोर सुतार यांच्या वतीने स्वातंत्र्यदिन अमृतमहोत्साचे औचित्य साधून मोफत आयडी कार्डचे वाटप करण्यात आले. आपण कमावलेल्या पुंजीतून समाजाचे देणे लागतो यानूसार किशोर सुतार व त्यांच्या पत्नी किशोरी सुतार ह्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत आयडी कार्ड वाटप करत असतात तसेच आदीवासी बांधवांना अल्पदरात फोटो काढून देतात या समाज सेवेबद्दल त्यांचे मराठी शाळा मुख्याध्यापक जगदीश भगत,सहशिक्षक सतीष तुरे, सुचीता पाटील, प्रतिक्षा पाटील, उर्दू शाळा शिक्षक मो. सिद्दीक,याकूब हन्नुरे,नसरीन मोहम्मद,समाजसेवक मुस्ताक औसेकर यांच्यासह श्रीगाव ग्रामस्थांनी आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा