You are currently viewing एन. एम. एम. एस. परीक्षेत भडगाव हायस्कूलचे यश

एन. एम. एम. एस. परीक्षेत भडगाव हायस्कूलचे यश

कुडाळ :

जून 2022 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती ( एन. एम. एम. एस. ) परीक्षेत कुडाळ तालुक्यातील कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक मधील कुमारी समृद्धी समीर वालावलकर हिने OBC प्रवर्गात जिल्ह्यात 14 वी व कुमारी आर्या अमित कल्याणकर हिचा सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात 30 वी क्रमांक मिळविला आहे. दोघांनाही प्रति वर्ष 15000 रुपये असे 4 वर्षाची 60000 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार असून पुढील शिक्षणाला हातभार लागणार आहे. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री. चंद्रशेखर सावंत , संस्था सचिव श्री. संभाजी वळंजु, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री. सचिन मुकुंद धुरी , पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + seventeen =