You are currently viewing पुनर्वसन साळ येथील सार्वजनिक गणेश मंदिराचा वर्धापन दिन २९ एप्रिल रोजी

पुनर्वसन साळ येथील सार्वजनिक गणेश मंदिराचा वर्धापन दिन २९ एप्रिल रोजी

विविध कार्यक्रमांनी होणार साजरा

दोडामार्ग

प्रतिवर्षीप्रमाणे पुनर्वसन साळ येथील सार्वजनिक गणेश मंदिराचा वर्धापन दिन सोहळा वैशाख शु. ०९ शके १९४५, शनिवार दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी संपन्न होत आहे, यानिमित्त देवस्थान कमिटी व ग्रामस्थ यांच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यात सकाळी ०८ वाजता श्रींची पूजा तदनंतर अभिषेक, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ०१ वाजता महाप्रसाद , संध्याकाळी ०४ वाजता स्थानिक ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन, संध्याकाळी ०६ वाजता – स्थानिक महिलांचे सुश्राव्य भजन रात्रौ ०९ वाजता प्रतिवार्षिक पाहुणीचा कार्यक्रम तर रात्र साडे नऊ वाजता “जय गणेश हौशी तरुण नाट्य मंडळ,पुनर्वसन- साळ” यांचा डॉ. गणेश हिर्लेकर लिखित व प्रवीण गावडे दिग्दर्शक सामाजिक आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी नाट्यपुष्प *”रक्तिमा”* सादर होणार आहे.

तरी वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती, सार्वजनिक गणेश मंदिर देवस्थान कमिटी व ग्रामस्थ पुनर्वसन साळ यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा