You are currently viewing सर्वोकृष्ट नगराध्यक्ष हा जागतिक स्तरावरील मानाचा पुरस्कार वेंगुर्लेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना जाहिर

सर्वोकृष्ट नगराध्यक्ष हा जागतिक स्तरावरील मानाचा पुरस्कार वेंगुर्लेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना जाहिर

वेंगुर्ला

जिनीयस फाऊंडेशन व वर्ल्ड रेकॉर्ड इंडीया या दोन संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणांत सर्वोकृष्ट नगराध्यक्ष हा जागतिक स्तरावरील मानाचा पुरस्कार वेंगुर्लेचे नगराध्यक्ष दिलीप लक्ष्मण गिरप यांना जाहिर करण्यात आला आहे.
जिनीयस फाऊंडेशन व वर्ल्ड रेकॉर्ड इंडीया या आंतर राष्ट्रीय स्तरावरील संस्थानी जगातील स्वच्छता सेवासह सर्व प्रकारच्या शासनाच्या स्वच्छतेचे नियम पाळून जनतेला सेवा दिलेल्या आहे. अशा सर्व सेवांचे सर्व्हेक्षण केले गेले.

या सर्व्हेक्षणासाठी महाराष्ट्राकरीता संजय विलास नार्वेकर व सुषमा संजय नार्वेकर यांना नियुक्त केले होते. या टीमने सर्वोकृष्ठ लोकसेवा, कोकण विभागातील कला दालन, शुन्य कचरा व्यवस्थापन, कचरा डेपोचे सर्वोकृष्ठ व्यवस्थापन, बहुस्तरीय कचरा विलगीकरण, प्लँस्टिक बंदीच्या नियमांची कडेकोट पालन, प्लँस्टिकच्या वापर करून टीकावू रस्ते या केलेल्या कामाची पहाणी केली. हि सर्व कामे सर्व्हेक्षणांत पहाणी करून नंतरच त्यांना योग्य वाटल्याने वर्ल्ड रेकॉर्ड इंडीया संस्थकडे सादर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वेंगुर्ले नगरपरीषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना वर्ल्ड रेकॉर्ड इंडीया या संस्थेचा जागतीक स्तरावरील सर्वोकृष्ठ नगराध्यक्ष पुरस्कार जाहिर केला आहे. त्यामुळे वेंगुर्ले नगरपरीषदेच्या इतिहासांत हा जागतीक स्तरावरील मानाचा तुरा ठरला आहे.
वेंगुर्ला नगरपरीषदेच्या वर्ल्ड रेकॉर्ड इंडीया या संस्थेने वेंगुर्ला नगरपरीषदेच्या या सर्व कामांची प्रत्यक्ष पहाणी करूनच वेंगुर्ले नगरपरीषदेस जागतिक स्तरावरील सर्वोकृष्ठ नगराध्यक्ष हा मानाचा पुरस्कार जाहिर केलेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − thirteen =