You are currently viewing खेड्यांचा सर्वांगीण विकास हाच राष्ट्र विकास – श्रीकांत सावंत

खेड्यांचा सर्वांगीण विकास हाच राष्ट्र विकास – श्रीकांत सावंत

कोकणामध्ये मानवता विकास परिषदच्या वतीने अभ्यास दौरा..

 

मसुरे :

 

खेड्यांचा सर्वांगीण विकास हाच राष्ट्र विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मानवता विकास परिषद या महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी नुकताच कोकणामध्ये अभ्यास दौरा केला असून यामध्ये त्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटीगाठी घेऊन याबाबतचा एक एक अहवाल तयार करून लवकरच शासन दरबारी तो मांडण्यात येणार असल्याची माहिती श्रीकांत सावंत यांनी मसुरे येथे बोलताना दिली.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज निर्माण व्हावीत आणि या कॉलेजमधून मातृभाषेतून शिक्षण मिळावे तसेच प्रत्येक ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स उपलब्ध व्हावेत आणि या सर्व रुग्णालयांमध्ये चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मानवता विकास परिषदच्या वतीने योग्य तो पाठपुरावा करण्यात येणार असून कोकणामधील प्रत्येक खेड्यामध्ये सर्व त्या परीने विकासात्मक पावले उचलण्यासाठी मानवता विकास परिषद नेहमी सकारात्मक असून प्रशासन दरबारी तसेच सर्वांच्या सहकार्याने योग्य ते प्रयत्न केले जाणार आहेत. या सर्व अभ्यास दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणी आपण भेटीगाठी घेऊन याबाबतचा एक अहवाल शासन दरबारी लवकरच मांडण्यात येणार असून खेड्यांचा विकास करण्याचे ध्येय नजरेसमोर असल्याचे प्रतिपादन मानवता विकास परिषद चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी मसुरे येथे यावेळी बोलताना सांगितले.

या अभ्यास दौऱ्या दरम्यान श्रीकांत सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील सिविल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वैद्यकीय सुविधांबाबत सविस्तरपणे चर्चा केली तसेच वैद्यकीय सेवा देताना प्रशासनास कोणत्या त्रुटी येत आहेत याबाबतची सुद्धा माहिती करून घेतली. यानंतर सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर प्रकाश गुरव आणि डॉ मनोज जोशी यांच्याशी सुद्धा चर्चा विनिमय केली.

याबाबत लवकरच प्रशासन दरबारी योग्य तो आवाज मानवता विकास परिषदच्या वतीने उठवण्यात येणार असल्याचेही श्री सावंत यांनी पुढे सांगितले. यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन अधिकारी श्री दिलीप पाटील यांची भेट घेऊन विकासात्मक कामांबाबत चर्चा विनिमय करून ग्रामीण भागातील विकास कशा पद्धतीने करता येईल याबाबतची ही सविस्तरपणे चर्चा केली.

या अभ्यास दौऱ्या दरम्यान मानवता विकास परिषदचे मालवण मधील कार्यकर्ते श्री ऐश्वर्य मांजरेकर यांनी श्रीकांत सावंत यांचे बांबर्डे येथे स्वागत करून बांबर्डे येथील कोनबॅंक या सामाजिक संस्थेस भेट दिली. या ठिकाणी या संस्थेचे श्रीहरी यांनी श्रीकांत सावंत यांचे स्वागत करून सविस्तर चर्चा केली. या नंतर मिलिंद पाटील यांच्या पिंगुळी येथील सह्याद्री बांबू नर्सरी येथे भेट देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांबू लागवड कशा पद्धतीने करता येईल याबाबतची सविस्तर माहिती मनाली पाटील यांच्याकडून घेतली. त्यानंतर श्रीकांत सावंत यांनी परमपूज्य राहुळ महाराज पिंगुळी मंदिरास भेट दिली. याच ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कृष्णा भाईप, श्री विठ्ठल सावंत, पत्रकार परेश राऊत, विजय केनवडेकर, तसेच उंब्रज येथील मधुसूदन कांदे या सर्वांशी कुक्कुटपालन अंडी व्यापार आधुनिक शेती, ग्रामीण विकास याबाबत सविस्तरपणे चर्चा केली. यानंतर पुढे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या दत्त मंदिरास भेट देऊन रात्रीच्या पालखी सोहळ्यास उपस्थिती दर्शविली. यादरम्यान भगीरथ ग्रामीण विकास प्रतिष्ठानला भेट देत व्यवस्थापक श्री नवीन मालवणकर यांच्याशी ग्रामीण विकासाबद्दल सर्वांगीण चर्चा करून संस्थेच्या कारभाराबद्दल बाबत माहिती जाणून घेतली.

युवा उद्योजक संतोष खोत यांच्या ऍग्रो फार्मला भेट दिली. या ठिकाणी मिरी लागवड सुपारी लागवड तसेच या ग्रामीण भागातील उद्योगांचा मार्केटिंग याबाबत सुद्धा सविस्तरपणे चर्चा करून माहिती जाणून घेतली. ग्रामीण शेतकरी विकासाबद्दल काय करता येईल याबाबतचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांशी, सामाजिक संस्थांशी, विविध संघटनांची भेट घेऊन जिल्हा विकासाबाबत माहिती जाणून घेऊन जिल्ह्यात मातृभाषेतून मेडिकल शिक्षण सुरू करणे आणि ग्रामीण भागातील खेड्यांचा विकास करणे याबाबत सर्वांशी चर्चा विनिमय करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक धार्मिक स्थळांना भेटी देऊन पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी काय करता येईल याचे सुद्धा माहिती घेऊन या सर्वांचा एक अहवाल तयार करून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी मसुरे येथे बोलताना मानवता विकास परिषदचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांच्यासोबत मानवता विकास परिषदचे ऐश्वर्य मांजरेकर आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा