पुर्वी एस टी स्टँडवरून सुटणाऱ्या गाड्या तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी…
फोंडाघाट
फोंडाघाट राधानगरी भोगावती मार्गावरून कोल्हापूरला जाणारी एसटी वाहतूक अखेर पाचव्या दिवशी सुरू झाली त्यामुळे फोंडाघाट वासियांना व नागरिकांमध्ये समाधान झाले त्यामुळे या सर्वांनी आम नितेश राणे, आम आविटकर, कणकवली- कोल्हापूर -राधानगरी पत्रकार सहकारी, विशेष प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे तसेच प्रसिद्धी माध्यमाचे धन्यवाद व्यक्त केले आहेत, मात्र प्रशासनाच्या गतिमान आणि वेगवान निर्णयाबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त होताना, यात कार्यक्षमतेने बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एक एप्रिल पासून दाजीपूर राधानगरी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर, कोकणातील लांब पडल्याच्या फोंडाघाट एसटी स्टँडवरून सुटणाऱ्या गाड्या, वैभववाडी गगनबावडा मार्गे वळविण्यात आल्या तर काही बंदही करण्यात आल्या. त्यामुळे दाजीपूर राधानगरी निपाणी- भोगावती इत्यादी घाट माथ्यावरील भागात जाणान्या येणाऱ्या प्रवाशांना, व्यापाऱ्यांना उरफाटा प्रवास दगदग, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. मात्र पाच-सहा दिवसातच वनविभागाने हरित पट्ट्यातील कामास हरकत घेतल्याने इतर वाहतूक म्हणजे कंटेनर. चिरे वाळूचे ट्रक, ट्रॉलर इत्यादी अवघड वाहनांसह चार चाकी वाहने कोणाच्या आशीर्वादाने अथवा आर्थिक उलाढाली तून खुलेआम सुरू झाली आणि आज अखेर प्रशासनाचाच भाग असलेली एसटी केवळ नोटिफिकेशनचे कारण देऊन गेले १४ दिवस बंद ठेवण्यात आली?
याकडे आमदार नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अहवाल सादर करण्याची आणि एसटी तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. कोल्हापूर- सिंधुदुर्ग पत्रकार सहकारी, सोशल मीडिया, आमदार अबिटकर, यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदनही दिले.