You are currently viewing कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा नाविन्यपूर्ण लोकाभिमुख उपक्रम 

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा नाविन्यपूर्ण लोकाभिमुख उपक्रम 

कणकवली शहरातील नागरिकांना आता मोफत रक्तपुरवठा

संपर्क साधण्याचे केले आवाहन

कणकवली

शहरातील जनेतेची गेली 5 वर्षे सेवा करत असताना शहरवासीयासाठी अनेक नावीन्य पूर्ण उपक्रम राबविले असून कणकवली शहरातील अपघात ग्रस्त,रुग्ण यांची रक्ता अभावी हेळसांड होवू नये म्हणून शहरातील गरजूंना मोफत रक्त पुरवठा करण्याचा उपक्रम आज पासून राबवित असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जाहीर केले.
कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी बंडू हर्णे,गटनेते संजय कामतेकर,भाजप शहर अध्यक्ष अण्णा कोदे,माजी नगरसेवक बंडू गांगण, महेश सावंत,सुशील पारकर, आदी उपस्थित होते.

कोरोना काळात कोविड सेंटर बरोबरच कमळ थाळी व अन्य आरोग्य विषयक उपक्रम राबवताना,अंत्य विधीसाठी वैकुठरथ अशा सारखे नावीन्य पूर्ण उपक्रम राबविले होते.आता रक्तासारखा महत्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुढाकार घेतला असून या उपक्रमा बाबत माहिती देताना श्री.नलावडे म्हणाले,आज पासून एक नवीन उपक्रम राबविला जाणार असून कणकवली शहरातील कोणत्याही नागरिकाला रक्ताची अवशकता भासल्यास त्यांनी मला माझ्या मो.९४२०२०६४६४ किंवा अण्णा कोदे मो.९४२२३८१९०० या नंबरशी संपर्क साधावा.त्या रुग्णाला शहरातील कोणत्या ही हॉस्पिटल मध्ये मोफत रक्त पुरवठा करण्यात येईल.यासाठी एका वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.ही सुविधा आज पासून कार्यान्वित केल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरवासियांसाठी अनेक प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा