You are currently viewing नानेली सरपंच चषक २०२३ स्पर्धेत ओझे स्पोट रत्नागिरीचा प्रथम; मानसीश्वर वेंगुर्लेचा द्वीतीय क्रमांक 

नानेली सरपंच चषक २०२३ स्पर्धेत ओझे स्पोट रत्नागिरीचा प्रथम; मानसीश्वर वेंगुर्लेचा द्वीतीय क्रमांक 

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील नानेली (नार्वेरवाडी) येथे २३ एप्रिल रोजी पारिजात कला क्रीडा मंडळाच्या वतीने सरपंच चषक-२०२३ खुल्या नाईट पासिंग हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धे दरम्यान १६ संघानी सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेमध्ये ओझे स्पोर्ट रत्नागिरी या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर मानसीश्वर वेंगुर्ला या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना शिवाजी आरेकर यांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा