You are currently viewing वेत्ये सोनुलीं मुख्य रस्त्याचे अर्धवट काम लवकरात लवकर पुर्ण करा; सरपंच गुणाजी गावडे

वेत्ये सोनुलीं मुख्य रस्त्याचे अर्धवट काम लवकरात लवकर पुर्ण करा; सरपंच गुणाजी गावडे

सावंतवाडी बांधकामच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना दिले निवेदन

सावंतवाडी:

वेत्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच गुणाजी गावडे यांनी वेत्ये सोनुलीं मुख्य रस्त्याचे अर्धवट काम लवकरात लवकर पुर्ण करा, अशी मागणी करत याबाबतचे निवेदन त्यांनी बांधकामचे कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडे सादर केले.

वेत्ये गावात जाणारा वेत्ये सोनुर्ली हा रस्ता डांबरे करण्यासाठी नव्याने मंजूर झाला असून याचे काम गतवर्षी सुरु करण्यात आले. होते परंतु संबंधित ठेकेदाराने खडीकरण करून हे काम तदनंतर बंद ठेवल्याने हा रस्ता ठीक ठिकाणी नादुरुस्त झाला आहे खडेकरण उकडून खड्डे निर्माण झाल्याने येथून वाहन चालवणे ही धोकेदायक बनला आहे एकूणच बांधकाम विभागाच्या गलथान करावा संदर्भात ग्रामस्थातून नाराजी व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =