*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री जयश्री जिवाजी कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*सुमधुर*
” सुमधुर “विषय जेव्हा आला, तेव्हा उच्चारतानाच निर्व्याज बालकाचं हास्य समोर आलं. किती गोड हसतं ना ते बाळ! एक प्रकारचं लाघवी माधुर्य असतं त्या हास्यामध्ये! किंचित काळ का होईना मनावरचं मळभ गळून पडतं आपल्या आणि आपणही हसतो त्याच्याकडे पाहून. आपल्याला जवळ घ्यावसं वाटतं त्या बालकाला .इतकं ते सुंदर दिसतं ते. देहभान विसरतो आपण ते हास्य पाहून !
तसेच हे सप्तसूर! त्यातले काही सूर असे आहेत की असं वाटतं, या सुरांच्या प्रवाहात असंच वाहत राहावं. आनंदाचे आवेग दाटून येतात मनात. डोळ्यातून अश्रूधारा वहायला लागतात. आणि या परतं दुसरं काही सुख असूच शकत नाही अशी अवस्था प्राप्त होते .काय माधुरी आहे ना या सुरांची! देहभान विसरतो आपण !
आणि हा “कृष्ण कन्हैया”, “माखनचोर”
वृंदावन का कृष्ण कन्हैया
सबकी आखों का तारा
त्याच्या सौंदर्याचं काय वर्णन करावं? घनश्याम ,
शामल रंग ,
त्याच्या पायाची अढी,
त्याने नेसलेला पितांबर,
त्याच्या कटीची मेखला,
त्याच्या माथ्यावर विराजमान असलेलं मोरपीस,
त्याच्या गळ्यातली वैजयंती माला,
त्याच्या ओठावरची ती वेणू ,
त्या वेणूतील जगाला मंत्रमुग्ध करून टाकणारे मधूर स्वर ,
त्या स्वरांमध्ये तल्लीन झालेली , त्याच्या शेजारी असलेली राधा ,
त्याच्यासाठी वेडं झालेलं गोकुळ,
गोप ,
गोपी ,
ती यमुना,
तो रास ,
किती वर्णन करावं! थिटी आहे माझी लेखणी! ओंजळीमध्ये समुद्र पकडायचा वृथा प्रयत्न कशाला करू मी? त्यांनं माणसाला “उत्तिष्ठत् , जागृत “,म्हणून सांगितलेली गीता, त्याचं सगळंच मधूर! त्याच्या जो जो जवळ जावं तितकं त्याचं माधुर्य आपल्याला कळत जाईल . आ ऽहाऽ ऽहा!
अहो ,हा देवांचा देव दास होतो भक्तांचा! भक्तांसाठी जेवण रांधतो .त्याला जेवायला वाढतो, त्याच्या घरी पाणक्याचं काम करतो. सर्वांग सुंदर आहे तो! कित्येक युगं झाली ,तो विटेवर उभा राहून भक्ताची वाट पाहत आहे. भक्तांना एवढी ओढ त्याची की त्याच्या चरणांना, त्यांना नखा बोटांना स्पर्श केल्याशिवाय भक्तांचं पोट भरत नाही. अशा या माझ्या पायात ,एवढी काय मोठी गोडी आहे ?की एवढे लोंढेच्या लोंढे येतात इथे त्या साठी,एकदा पहावं तरी! असं त्याला वाटलं असावं आणि बालकृष्णाच्या रूपामध्ये त्याने त्या अंगठ्यामधलं माधुर्य चाखून पाहिलं !सारंच अलौकिक त्याचं!” मधुराष्टकम्” लिहिताना “महाप्रभू वल्लभाचार्य” त्यांनी केलेलं यथार्थ वर्णन अविट गोडीचं! देहभान विसरायला लावणार !खरंच भगवंताचं सारंच अलौकिक!
|| मधुराधिपते अखिलम् मधुरम्||
जयश्री जिवाजी कुलकर्णी
नाशिक
*संवाद मिडिया*
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————