You are currently viewing आनंद

आनंद

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी प्रो. डॉ. जी. आर. उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम लेख*

*।। आनंद ।।*

सुख म्हणजेच आंनद
दुःख म्हणजे वेदना !

अनुकूल वेदनियम सुखम ।।
प्रतिकूल वेदनियं दुःखम ।।

अस आयुर्वेद म्हणतोय !
Ease अँड disease !!
स्वस्थ असणं सुखकारक
अस्वस्थ असणं रोगी असणं दुखकारक ! अशी सोपी व्याख्या आयुर्वेद करतो ! जी व्यख्या मॉडर्न मेडिसीनला पण करता आली नाही !
आता नेमकं सुख म्हणजे काय ? दुःख म्हणजे काय ? ते सविस्तर पाहूच .
सुख व दुःख हे जीवनात अनादी अनंत काळापासून चालत आलेले आहे . प्रत्येकाच्या सुख व दुःखा च्या व्यख्या भिन्न आहेत . आंनदाचे ( सुख ) प्रकार असंख्य आहेत ! तरीपण फक्त 5 प्रकारेच आंनद घेता येतो ! चराचर सृष्टी पांच भौतिक असल्याने , पाच महाभूतांचे 5 गुण, शब्द , स्पर्श रूप रस गंध . ह्या गुणांमार्फत पाच प्रकारचे आंनद मिळवू शकतोच .
1 ) शब्द – कटू व गोड शब्द , चांगले गीत , काव्य कादंबरी . इत्यादी
2 ) स्पर्श – आईचा स्पर्श बापाचा स्पर्श , मुलीचा स्पर्श, बायकोचा स्पर्श ( शृंगार )
3 ) रूप – बाह्य रूप , चांगले वाईट .
4 ) रस – म्हणजे आपल्या जिभेला जी चव लागते त्याला रस म्हटले आहे उदा .
गोड तिखट आंबट कडू तुरट लवण असे 6 प्रकारे आपण रसपान करू शकतो
5 ) गंध – म्हणजे वास
चांगला किंवा वाईट
अश्या प्रकारे आपण आंनद घेत असतो .
असे जरी असले तरी ,
हा आंनद घेण्यासाठी आत्मा व मन असावे लागते ! तरच त्या शरीराला त्याचे सुख दुःख प्राप्त होत असते ! आत्मा हा अविनाशी मन हे आत्म्याला तादात्म्य पावलेले असते . मनाची गती ही
मारूत तुल्य वेगम ! मन हे चंचल असते ! ते शरीराला काबूत ठेवते उदा . आज मला सुंदर हॉटेल मध्ये खाणं खायचं आहे ! ते शरीराला तेथे घेऊन जाते ! व आनंद मिळवते ! जे क्षणिक आहे !
ज्याच्या मनावर ताबा असेल तो जीवात्मा श्रेष्ठ !
आंनद हा क्षणीक व दीर्घकालीन असा पण प्रकार करता येईल . आंनद ज्याच्या त्याच्या स्वभावनुसार , प्रकृती नुसार वेगवेगळा असू शकतो !
म्हणजे इथं पण पांच भौतिक प्रकृती आलीच ! सांख्य सिद्धांताचा नियम लागू झाला ! आनंद सात्विक , राजस , तामसी असे पण आंनद आहेत ! एखाद्याच वाईट झालेलं बघण्यात जो असुरी आंनद असतो , त्याला असूया म्हणतात ! आता हा आनंद कोठून आला ! तर तो षड्रिपु जे आहेत त्यातूनच आला !
काम क्रोध मद मत्सर दंभ लोभ ! हे षड्रिपु मनाला आत्म्याला पर्यायाने , शरीराला ! स्वस्थ बसून देत नाहीत ! ते काहीतरी रोज काम करत असतात ! माझ्या मता प्रमाणे जो षड्रिपुला जिंकला तोच आंनदी होय ! अशी व्यक्ती ही संत पदाला पोहचलेली असते .
आनंद हा व्यक्तिसापेक्ष असतो . तो कुठल्या बाजारात मिळत नाही ! तो आंनद आपणच निर्माण करावा लागतो ! मन हे सात्विक असावे लागते .
आत्मा व मन शरीरात असते , म्हणून ते शरीर ज्यावेळी मृत होते त्यावेळीच त्या शरीराचा आंनद किंवा सुख दुःख वेदना क्लेश कष्ट
हे त्या शरीरा बरोबर निघून जातात !
।।आंनदाचे डोही आंनद तरंग।।

विषय खूपच गहन आहे . म्हणून लेखनसीमा !

आपला विनीत –

प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी
अंकली बेळगाव
ज्येष्ठ कवी लेखक
कॉपी राईट 7 मे 2023

 

👩‍💻🧑‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻🧑‍💻

*_प्रवेश सुरू.. प्रवेश सुरू… प्रवेश सुरू….._*🏃‍♀️🏃‍♂️

*स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करायची सुवर्णसंधी*

*⚜️महेंद्रा ॲकॅडमी⚜️*

*🔰स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र🔰, सावंतवाडी*

*_🌎सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली एक विशेष चळवळ_*

*_♻️सिंधुदुर्ग जिल्हा हा 10 वी 12वी च्या परीक्षांच्या निकालाचा विचार करता अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण नंतर ही मुले कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये का दिसत नाहीत? स्पर्धापरीक्षांमध्ये आपला जिल्हा मागे का पडलाय? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आले आहे ? महेंद्रा अकॅडमी सावंतवाडी._*
*_♻️आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिका-यांचा जिल्हा म्हणून नावारुपाला येईल याचे सर्वतोपरी प्रयत्न महेंद्रा अकॅडमी तर्फे केले जातील._*

*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*

*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) व सर्व प्रकारच्या सरळ सेवा भरती*

*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2023*

*3.🔰 सर्व प्रकारच्या बँकिंग परीक्षा स्पेशल बॅच -2023*

🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*

*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:

*📌अनुभवी शिक्षकवर्ग.*
*📌सुसज्ज वाचनालय.📚📚*
*📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.*
*🏠निट व स्वच्छ वर्ग.*
*📌पिण्याचा पाण्याची सोय.*
*📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.*
*📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.*
*📌अनोखी शिकवण्याची पद्धत*

*_👉आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा._*
*_”मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या._*

*अधिक माहितीसाठी संपर्क करा*

*📲7350219093*
*📲9022686944*

*जाहिरात लिंक*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =