You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मानवी जीवनाला प्रकाशित करणारा ‘पुस्तक दिन’ साजरा:

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मानवी जीवनाला प्रकाशित करणारा ‘पुस्तक दिन’ साजरा:

सावंतवाडी

मनुष्य जीवनात ज्ञानाला प्रकाश देणारे व आपल्या आयुष्याला योग्य गती देण्याचे कार्य करणाऱ्या आपल्या गुरुप्रमाणे पुस्तकालाही किती महत्त्व आहे हे पटवून देण्याच्या उद्देशाने स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल या शाळेत ‘पुस्तक दिन’ साजरा केला गेला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनुष्य जीवनासाठी पुस्तक कसे फायदेशीर ठरते व पुस्तकांचा मनुष्य जीवनात किती सकारात्मक परिणाम होतो याची माहिती शाळेतील सहा. शिक्षिका सौ. जागृती तेंडोलकर यांनी दिली. या दिनानिमित्त इयत्ता पहिली मधील विद्यार्थिनी ‘ आद्या कुंभार’ हिने हिंदी कवितेचे वाचन केले. त्याचप्रमाणे शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वाचनालयात आळीपाळीने पुस्तके वाचण्याची संधी दिली गेली. तसेच शाळेचे संचालक ‘श्री. रुजुल पाटणकर’ व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी देखील भावी पिढीच्या उत्तम प्रगती करिता या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना प्रोत्साहन दिले. अशाप्रकारे हा कार्यक्रम, कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थी, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनाच आपल्या जीवनात गुरुंप्रमाणे पुस्तकांच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन प्राप्त करून जीवनाला योग्य गती प्राप्त करण्यास प्रोत्साहित करणारा ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा