मुंबई-गोवा हायवेवर महिला बचतगट, शेतकरी यांच्यासाठी दुकाने उभारावीत

मुंबई-गोवा हायवेवर महिला बचतगट, शेतकरी यांच्यासाठी दुकाने उभारावीत

भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सावंत यांची मागणी

सिंधूदुर्गनगरी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी. कृषि व्यवसाय वाढावा याकरिता शेतकऱ्यांच्या व महिला बचतगटांच्या प्रक्रिया केलेला कृषि माल विक्रीकरिता मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याच्या लगत प्रत्येक २५ किलो मीटर अंतरावर दोन्ही बाजूला बाजारपेठा बनविण्यात याव्यात, अशी मागणी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सावंत यानी प्रसिद्धि पत्रकाद्वारे केली आहे. यावेळी त्यांनी ‘मुख्यमंत्री यानी जाहिर केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहिर करण्यात आलेली नुकसानीची रक्कम मिळावी. पिक विमा योजने अंतर्गत जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना नुकसानी मिळावी, अशा अन्य मागण्या सुद्धा केल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा