You are currently viewing महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात राजकीय प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बळी

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात राजकीय प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बळी

निष्काळजी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा झालाच पाहिजे.

काँग्रेसची आक्रमक भूमिका

कुडाळ

एकीकडे देशातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कार बंद हॉल मध्ये दिला जातो. महाराष्ट्र भूषण पुरस्कारही या पूर्वी राजभवनात दिला आहे, असे असतानाही एवढ्या तळपत्या उन्हात सोहळा आयोजित करण्यात करून ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करून त्या कार्यक्रमात उपस्थित लाखो अनुयायांचा राजकीय फायदा मिळावा यासाठी सरकारचा आटापिटा होता.
योग्य नियोजन न करणाऱ्या निष्काळजी शिंदे फडणवीस सरकारवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे यांनी केली आहे. कुडाळ, सिंधुदुर्ग येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सरकारच्या आकडेवारीनुसार १४ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु हा आकडा त्या पेक्षा जास्त असू शकतो, त्याप्रमाणे ५०० पेक्षा जास्त लोक उपचार घेत आहेत.ती संख्याही प्रत्यक्षात खूप मोठी आहे. सरकारने मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली परंतु याने प्रश्न संपत नाही. घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्री अचानक मृत्यू पावल्यावर पाच लाखात वारसदार आपला उदरनिर्वाह कसा चालवणार? असा प्रश्न उपस्थित करून सरकारला आमचे प्रश्न आहेत की,एवढा मोठा कार्यक्रम भर उन्हात दुपारी का घेतला? अप्पासाहेबांचे लाखो जमणार होते हे माहिती असताना त्यांच्यासाठी तंबूची व्यवस्था का केली नाही ? १३ कोटी रुपये खर्चून एवढे ढिसाळ नियोजन कसे ? एवढा पैसा नक्की कुठे गेला?एखाद्या कार्यक्रमात काही विपरीत घडले तर त्या कार्यक्रमाच्या आयोजकावर गुन्हा दाखल केला जातो, मग आयोजक राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला जात नाही?


आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिलेल्या वेळेनुसारच कार्यक्रम घेतला असे सरकारमधील मंत्री सांगत असून एवढ्या मोठ्या व्यक्तीवर हा आरोप लावणे व स्वतःवरचा गुन्हा लपविणे हा प्रकार निंदनीय असून त्या पेक्षा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला व व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्यात सरकार कमी पडले आहे.हे सत्य का नाकारीत सरकार का नाकारीत आहे? ही निव्वळ सरकारचीच जबाबदारी आहे. जबाबदारी झटकून आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरच खापर फोडण्याचा प्रकार सुध्दा घृणास्पद व निंदनीय आहे.
खारघरमध्ये झालेली घटना ही अत्यंत गंभीर असून शिंदे -फडणवीस सरकार त्याकडे फारसे गांभिर्याने पाहायला अजूनही तयार नाही.
या घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यायला हवे होते पण त्यांची गेंड्याची कातडी आहे.म्हणून राज्यपाल महोदयांना काँग्रेस पक्षाने विनंती केली आहे की, खारघरमधील घटनेसंदर्भात सर्व सत्य बाहेर आले पाहिजे आणि त्यासाठी विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. पण त्यांच्याकडूनही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. त्याच प्रमाणे मृत्यू झालेल्या मृतांच्या वारसांना रुपये किमान ५० लाख इतकी रक्कम मिळावी अशी मागणीही बरगे यांनी या वेळी बोलताना केली.
या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हा अध्यक्ष साईनाथ चव्हाण, विकास सावंत, अरविंद मोंडकर, प्रवीण वरूनकर, महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष श्रीमती साक्षी वंजारी,कुडाळच्या , तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अभय शिरसाट, कु.सुंदरवल्ली पडीयाची , प्रकाश जैतापकर, ॲड्. दिलीप नार्वेकर, विद्याप्रसाद बांदेकर,श्रीकृष्ण तळवडेकर, देवानंद लुडबे, मेघनाथ धुरी, महेंद्र संगेलकर, समीर वंजारी, केतनकुमार गावडे,अमिदी मेस्त्री, जस्मिन लक्स्मेश्वर,आनंद परुळेकर,अमोल सावंत,चंद्रशेखर जोशी,सुभाष पाटकर,अमोल सावंत, तबरेज शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा