You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ डॉ. अजिंक्य वराडे यांची नियुक्ती

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ डॉ. अजिंक्य वराडे यांची नियुक्ती

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस जिल्हा रुग्णालय येथे पॅथॉलॉजिस्ट म्हणून डॉ. प्रेरणा पांडुरंगराव गायकवाड आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ म्हणून डॉ. अजिंक्य रवींद्र वराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी खास प्रयत्न करून आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. युवा सेनेचे तालुकाध्यक्ष प्रतीक बांदेकर यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या कित्येक दिवसांपासून जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय या दोन ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची असलेली कमतरता आता भरून निघाली आहे. लवकरच अन्य पदे भरण्यात येणार आहेत असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी केसरकर यांना दिले आहे अशी माहिती आमदार केसरकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा