अॅड सर्जेराव साळवे यांची सल्लागार पदी निवड :
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावची नुकतीच झूम मीटिंग संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी फाउंडेशनचे मुखपृष्ठ असावे व त्यासाठी संपादक मंडळ असावे अशा प्रकारची चर्चा मागील झूम मीटिंगमध्ये करण्यात आली होती. हा विषय डॉ. उज्जैनकर यांनी मांडलेला होता व त्याप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांनी या विषयाला अनुमोदन दिले. त्याप्रमाणे डॉ.उज्जैनकर यांनी फाउंडेशनच्या त्रैमासिकाचे संपादक मंडळ पुढीलप्रमाणे जाहीर केले.
संपादक राज्य सचिव छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. डॉ. सुभाष बागल, सहसंपादक राज्य संपर्कप्रमुख कोल्हापूर येथील डॉ. श्रीकांत पाटील, सहसंपादक राज्य समन्वयक मुंबई येथील सौ. लताताई गुंठे, सदस्य कार्यकारिणी सचिव श्री प्रमोद पिवटे मुक्ताईनगर राज्य सल्लागार, अकोला येथील श्री तुळशीराम बोबडे, खामगाव येथील श्री पांडुरंग दैवज्ञ , फोंडा गोवा येथील डॉ. अनिता तिळवे, ठाणे जिल्हा समन्वयक श्री रमेश उज्जैनकर, पुणे जिल्हा समन्वयक श्री तान्हाजी बोऱ्हाडे, आदी सदस्य तर पुढीलप्रमाणे सल्लागार मंडळ जाहीर करण्यात आले – राज्य अध्यक्ष अमरावती येथील डॉ. सतीश तराळ, राज्य उपाध्यक्ष पुणे येथील डॉ. प्रतिमा इंगोले, गोवा राज्य संपर्कप्रमुख अॅड अजितसिंह राणे , कार्यकारणी सदस्य श्री विनायक वाडेकर मुक्ताईनगर, बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके ,अॅड सर्जेराव साळवे छ. संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख, आदी पदाधिकाऱ्यांचा या त्रैमासिक फाउंडेशनच्या मुखपृष्ठाच्या संपादक मंडळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व मान्यवरांचे पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
छ. संभाजी नगर येथील डाॅ सुभाष बागल यांची मुख्य संपादक तसेच अॅड सर्जेराव साळवे यांची सल्लागार पदी निवड झाल्याबद्दल आणि संपादकीय कार्यासाठी छ. संभाजी नगर शहराची निवड करून विश्वास व्यक्त केल्याबद्दल अॅड सर्जेराव साळवे यांनी सर्व पदाधिकारी व विश्वस्त मंडळ तथा निवड समितीचे आभार मानले. हे ञैमासिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवले जाईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनने स्वतः चे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले..