You are currently viewing छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून बांद्यात १४ मे ला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून बांद्यात १४ मे ला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

बांदा

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने रविवार १४ मे ला शालेय व खुल्या गटात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या वतीने येथील गंधर्व फोटो स्टुडिओत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
इयत्ता पहिली ते चौथी गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराज’ हा विषय ठेवण्यात आला असून वेळ ३ ते ४ मिनिटे आहे. इयत्ता पाचवी ते आठवी गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराज यांचे बालपण’ हा विषय ठेवण्यात आला असून वेळ ४ ते ५ मिनिटे ठेवण्यात आला आहे. खुल्या गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रशासन’ किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचे अर्थकारण’ हे विषय ठेवण्यात आले असून यासाठी ६ ते ७ मिनिटे वेळ ठेवण्यात आला आहे.
ही स्पर्धा जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नंबर १ येथे होणार आहे. सकाळी ९ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना देखील रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
यावेळी प्रतिष्ठानने अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत, जे. डी. पाटील, अक्षय मयेकर, अनुप बांदेकर, प्रथमेश राणे, नारायण बांदेकर, संकेत वेंगुर्लेकर, तनिष मेस्त्री, मिताली सावंत आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी संकेत वेंगुर्लेकर (मो. ९०१११०७५६२) किंवा अक्षय मयेकर (मो. ९५०३८७१९२४) यांच्याशी संपर्क साधावा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा