You are currently viewing सिंधुदुर्गातील दारू माफियांना कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क चा वरदहस्त

सिंधुदुर्गातील दारू माफियांना कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क चा वरदहस्त

सिंधुदुर्ग उत्पादन शुल्क हतबल

गोवा बनावटीच्या दारूची राजरोसपणे वाहतूक गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्हा मार्गे होत आहे. कोल्हापूर येथील राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाच्या आशीर्वादाने गोव्यातील दारू कोल्हापूर, सांगली निपाणी येथे पोचवली जात आहे. फोंडयाचा दारू तस्कर म्हणून नावाजलेला आप्पा, कुडाळ तालुक्यातील अंधार पडलेल्या गावातील वालावल जवळचा मन्या ,मायचो सोरो बरो म्हणनारो फरसुलो, देवाचो नैवेद्य म्हणतात तो प्रसाद असे चार जणांचे रॅकेट गोवा बनावटीच्या दारूच्या वाहतुकीत जोरदार कार्यरत असून कोल्हापूर येथील पथक त्यांच्या गाड्या विनासायास जिल्ह्यातून पास करून देत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त एकाच भाई ला ही चौकडी दारू पुरवते, बाकी पूर्ण माल त्यांच्या दिवसाला चार चार गाड्या भरून मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्यातून पास होतात. शनिवारी सकाळीच ८.०० वाजता देवगडला एक गाडी पास झाली. बांदा व सातार्डा लाठीवरून रात्रौ १२, २.३०, ३.०० वाजता कोल्हापूर पथकाच्या क्लियर लाईनवर गाड्या पास झाल्या. कोल्हापूर राज्य उत्पादन खात्याचे पथक या गाड्यांना मार्ग मोकळा करून देतात आणि कोल्हापूर सांगली सातारा, निपाणी इत्यादी ठिकाणी या दारूचा साठा भरलेल्या गाड्या विनासायास पोचतात.
कोल्हापूर येथील पथकाची ड्युटी लागली की सिंधुदुर्ग जिल्हा उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाचे काही चालत नाही. कोल्हापूर येथील हे पथक देखील दारू तस्करांच्या पैशांच्या जोरावर बांदा येथील डोंगरातील एका हॉटेलमध्ये ऐषाआरामत राहतात. दारू तस्कर तशी त्यांची बडदास्त ठेवतात. त्यामुळे राज्य सरकारचा कित्येक कोटींचा महसूल बुडत असून सरकारचा हजारो लाखो रुपये पगार घेणारे हे अधिकारी दोन्ही बाजूंकडून माल घेऊन मात्र मालामाल झाले आहेत. जिल्ह्यात होणारी ही दारू तस्करी रोखणार कोण?

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − one =