You are currently viewing कोकण रेल्वेत चहा विक्रेत्यावर हल्ला..

कोकण रेल्वेत चहा विक्रेत्यावर हल्ला..

सावंतवाडी

चहाचे पैसे मागितल्याच्या रागातून प्रवाशांकडून कोकण रेल्वेत चहा विकणाऱ्या एका विक्रेत्या- वर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. दिलीप सिंग असे जखमीचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मडगाव एलटीटी या गाडीत घडली.

दरम्यान, आक्रमक असलेल्या हल्लेखोराला गाडीत असलेल्या संतप्त प्रवाशांनी झाराप येथे रेल्वेच्या बाहेर ढकलून दिले. त्यामुळे तोही जखमी झाला आहे. याबाबतची माहिती कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली. दरम्यान हा प्रकार चालत्या रेल्वेत तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरात घडल्यामुळे तो गुन्हा शून्य नंबरने सावंतवाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे हे कणकवली येथे रवाना झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा