You are currently viewing पुस्तकाचे महत्व

पुस्तकाचे महत्व

*काव्यनिनाद साहित्य मंच पुणेच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभाताई पिटके लिखित अप्रतिम अभंग रचना*

*पुस्तकाचे महत्व*

पुस्तक वाचणे। आवडे मजला।।
आनंद दाटला। वाचतांना।।१।।

पुस्तकाचे पान। विचारांना गती।।
जीवन प्रगती। वाचनाने।।२।।

पुस्तकाचे पान। वाटते कौतुक ।।
माहिती मिळते। पुस्तकात।।३।।

मित्र खरोखर।।पुस्तके असती
नेहमी मिळती। सहजची।४।।

ज्ञान मिळण्यास।पुस्तक वाचावे।।
पान उघडावे। आनंदाने।।५।।

वाचा नियमित। एक तरी पान।।
मिळणार मान। समाजात।। ६।।

सांगते प्रतिभा।तुम्हा विनवुनी।।
पान उघडोनी। वाचा तुम्ही।।७।।

प्रतिभा पिटके
अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा