You are currently viewing संकल्प..

संकल्प..

*कुरुंदवाड येथील लेखक कवी प्रा.दिलीप सुतार यांची अप्रतिम काव्यरचना*

 

*संकल्प*

 

आव्हान पेलण्या महायुद्धाचे

संघटीत जागतिक संकल्प हवा….

 

समस्त जगाच्या कल्याणास्तव

मनी प्रामाणिक हेतू हवा….

 

दाही दिशाना जोडणारा

मान्यव्याचा मजबूत सेतू हवा….

 

विश्वशांतीच्या यज्ञासाठी

अण्वस्त्र अहंकाराचा त्याग हवा….

 

वाढविण्या सौंदर्य मानवतेचे

‘जगा जगू द्या’ मंत्राचा घोष हवा…

 

भावी पिढ्यांच्या तनामनांवर

अहिंसेचा भक्कम संस्कार हवा…

 

दाखविण्या योग्य पथ जगाला

एक नवा प्रेषित हवा…

 

ह्रदयाच्या गाभा-यात स्थापित

येशू बुद्ध अन् गांधी हवा….

 

प्रा.दिलीप सुतार

कुरूंदवाड

मो.नं 9552916501

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − fifteen =