You are currently viewing कुडाळ मालवण आज भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळावा

कुडाळ मालवण आज भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळावा

कुडाळ :

 

कुडाळ मालवण तालुक्यातील भाजपाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळावा आज शनिवारी २२ एप्रिल रोजी होणार आहे. कुडाळ येथे सकाळी १० वाजता महालक्ष्मी हॉल तर ३.३० वाजता अथर्व मंगल कार्यालय कुंभार माठ मालवण येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तर भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती मेळाव्यास असणार आहे. याबरोबरच या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष राजन तेली, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी मार्गदर्शन करणार आहे. या मेळाव्यात बुध सक्षमीकरण आणि आगामी निवडणुका या विषयावर आढावा आणि मार्गदर्शन होणार आहे.

यासाठी भाजपाच्या सर्व जिल्हा आणि तालुका (मंडल) पदाधिकारी, सर्व मोर्चा आघाडी पदाधिकारी, सर्व बुथ अध्यक्ष आणि पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, शक्ती केंद्र प्रभारी, जिल्हा परिषद प्रभारी, आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास संस्था चेअरमन, सहकारातील पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =